Monday, July 1, 2024

‘हिंदू नपुंसक कधी झाला कळालेच नाही’, अभिनेते शरद पोंक्षे यांचे वक्तव्य

अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे त्यांच्या बिंधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत येत असतात. विविध राजकीय तसेच सामाजिक विषयांवर ते परखडपणे आपले मत मांडत असतात. त्यांच्या या परखड आणि रोखठोक वृत्तीचे कधी कौतुक होते तर कधी त्यांना टिकेलाही सामोरे जावे लागते. सध्या त्यांच्या अशाच आणखी एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्यामध्ये त्यांनी हिंदू धर्माबद्दल रोखठोक मत व्यक्त केले आहे. काय आहे हे नेमके प्रकरण, चला जाणून घेऊ.

शरद पोंक्षे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांमुळे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शरद पोंक्षे एक प्रतिभावान अभिनेते तर आहेतच त्याचबरोबर ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही विशेष प्रसिद्ध आहेत. अलिकडेच त्यांच्या एका डोंबिवलीमधील भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांचे परखड विचार मांडले आहेत.

या भाषणामध्ये शरद पोंक्षे म्हणाले की, “अहिंसा परमो धर्म यामध्ये फक्त अर्धाच श्लोक आम्हाला शिकवला गेला. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, आणि या सर्वश्रेष्ठ धर्माचे रक्षण करताना हातात शस्त्र घेणे हा त्यापेक्षा मोठा धर्म आहे, हे आम्हाला शिकवलेच नाही. अहिंसेचा आम्हाला एवढा डोस पाजला की हा हिंदू समाज अहिंसक होता होता नपूंसक कधी झाला हे देखील कळले नाही.”

त्याचबरोबर या भाषणात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दलही आपले परखड विचार मांडले. सध्या त्यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, शरद पोंक्षे यांनी मराठी सिनेसृष्टीत कनिका, उंच माझा झोका, मोकळा श्वास,  अग्निहोत्र अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा –शहनाज गिलचा नवीन लूक चाहत्यांना करतोय घायाळ
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा! ह्रदयविकाराच्या झटक्याने ३० वर्षीय अभिनेत्याचे दुखःद निधन
‘या’ बॉलीवूड कलाकाराचा विमान अपघातात झाला होता मृत्यू, पाहा यादी…..

हे देखील वाचा