Friday, April 18, 2025
Home अन्य ऑल इज वेल! आर माधवनच्या ‘३ इडियट्स’ पोस्टवर शरमन जोशीची प्रतिक्रिया, म्हणाला ‘मला कोरोना…’

ऑल इज वेल! आर माधवनच्या ‘३ इडियट्स’ पोस्टवर शरमन जोशीची प्रतिक्रिया, म्हणाला ‘मला कोरोना…’

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खान आणि अभिनेता आर माधवन नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. सध्या ते क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर माधवनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची बातमी एकदम मजेशीर अंदाजात दिली होती. त्याने सन २००९ मध्ये रिलीझ झालेल्या आपल्या ‘३ इडियट्स’ चित्रपटाशी आपले म्हणणे जोडत लिहिले होते की, सर्वकाही ठीक आहे आणि बरा होत आहे.

माधवनचे ट्वीटच्या माध्यमातून केला होता कोरोना पॉझिटिव्हचा खुलासा
आर माधवनने ‘३ इडियट्स’ चित्रपटाचा पोस्टरमधून केवळ आपला आणि आमिर खानचा फोटो शेअर केला होता. त्याने ट्वीट करत लिहिले होते की, “फरहानने रँचोला फॉलो केले आणि व्हायरस नेहमी आमच्या मागे राहिला. परंतु यावेळी आम्हाला त्याने पकडले. ऑल इझ वेल आणि कोव्हिड लवकरच बरा होईल. ही एक अशी जागा आहे, जिथे राजू येऊ नये, असे आम्हाला वाटत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. मी एकदम ठणठणीत आहे.”

शरमन जोशीने दिली प्रतिक्रिया
माधवनच्या या ट्वीटनंतर राजूने म्हणजेच शरमन जोशीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरमनला माधवनचा अंदाज खूपच आवडला आहे. त्याने लिहिले की, “मी आशा करतो की, मी तुमच्या क्लबमध्ये येणार नाही. परंतु मॅडी मानलं पाहिजे, तू जे काही लिहिलं आहे, ते खूपच चांगले आहे. हे खरंच खूप मजेशीर होते.”

शरमन जोशीच्या ट्वीटला प्रत्युत्तर देत माधवनने लिहिले की, “हाहाहा… हो भावा. तू सुरक्षित आणि निरोगी राहा.”

३ इडियट्स चित्रपट ठरला होता ब्लॉकबस्टर
खरं तर ‘३ इडियट्स’ चित्रपटात आमिर खानने रँचो, आर माधवनने फरहान आणि शरमन जोशीने राजू रस्तोगीची भूमिका साकारली होती. हे तिघेही इंजीनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी बनले होते. तसेच बोमन इराणी चित्रपटात वीरू सहस्त्रबुद्देच्या भूमिकेेत होते. हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते. या चित्रपटातील ‘ऑल इज वेल’ हा डायलॉग आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० पेक्षा अधिक कोटींचा गल्ला जमवला होता.

बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंतच्या कलाकारांना कोरोनाची लागण
कोरोना व्हायरसबद्दल बोलायचं झालं, तर मनोरंजन क्षेत्रात कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, सतीश कौशिक, परेश रावल यांच्यासोबतच टीव्ही कलाकार अमर उपाध्याय, प्रियल महाजनही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशामध्ये सर्व कलाकार सावधगिरी बाळगण्यासोबतच मास्क घालण्याचाही सल्ला देत आहेत.

हे देखील वाचा