मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचे नाव म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. अभिनयासोबतच लेखन, कविता, दिग्दर्शन अशा इतर माध्यमांमध्ये देखील यशस्वी असणारा संकर्षण सोशल मीडियावरही कमालीचा सक्रिय आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये तो दिसत असला तरी नाटकांमध्ये त्याचा वावर जास्त असतो. सध्याच्या घडीला संकर्षणचे लेखन आणि अभिनय असणारे काही नाटकं रंगभूमीवर दमदार गाजत असून, त्याचे चांगलेच कौतुक होत आहे. मराठी प्रेक्षक आणि कलाकारांसोबत इतर भाषेतील कलाकार देखील त्याच्या नाटकांना उपस्थित राहताना दिसत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संकर्षण अनेक गोष्टींची माहिती देत असतो. नुकतीच त्याने सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का देणारी अजून एका बातमी दिली आहे. झाले असे की, नुकताच त्याच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचा मुंबईमध्ये एक शो संपन्न झाला. या शोला बॉलिवूडमधील एक हरहुन्नरी अभिनेत्याने हजेरी लावली. नुसती हजेरी नाही लावली तर पहिल्या रांगेत बसून शो पूर्ण पहिला आणि संकर्षणची भेट घेऊन त्याचे कौतुक देखील केले. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शर्मन जोशी होता.
View this post on Instagram
याबाबत एक पोस्ट शेअर करताना संकर्षणने लिहिले, “तू म्हणशील तसं’च्या कालच्या प्रयोगाला पहिल्या रांगेत अंधारात कुणीतरी ओळखीचा चेहरा दिसला.. मी पहिल्या प्रवेशाच्या Exit नंतर आतून डोकवून पाहिलं तर ; #bollywood मधला लाडका, फेमस अभिनेता शर्मन जोशी आला होता..??? पूर्ण प्रयोग त्यांनी मन लाउन पाहिला.. त्यांना नाटक खूssssप आवडलं .. खूप कौतुक पण केलं .. फार फार भारी वाटलं बघा .. स्टाईल , गोलमाल , ३ ईडियट्स सारख्या सिनेमांत पाहिलेला हा माणुस आपलं कौतुक करत होता.. मज्जा आली ? आणि काम तुम्ही कुठेही करा हो.. नाटकाशी जोडलेला माणुस नाटकाकडे येतोच.” यासोबतच त्याने शर्मन जोशीसोबतचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
दरम्यान शर्मन जोशी हिंदीसोबत गुजराती नाटक आणि चित्रपटांमध्ये सक्रिय असून, तो तिथे लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. शर्मन ओटीटीवरही हिट असून, तो शेवटचा ‘बबलू बॅचलर’ हिंदी सिनेमात दिसला होता. तर गेल्याच महिन्यात त्याचा ‘काँग्रॅच्युलेशन्स’ हा गुजराती सिनेमाही प्रदर्शित झाला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम शैलेश लोढांनी सांगितलं सीरियल सोडण्यामागील खरं कारण, म्हणाले…
काम मिळवण्यासाठी ‘गंगुबाई काठियावाडी’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा 40 वर्षे संघर्ष, सावळा रंग ठरले कारण