प्रत्येकालाच अधिक पगाराची अपेक्षा असते. अगदी कमी कष्टात जर कोणी जास्त पगार देत असेल तर मग विचारायलाच नको. मात्र असे प्रत्येकाच्या बाबतीतच घडते असे नाही. मात्र तरीही जर आम्ही तुम्हाला सांगितले की, तुम्हाला डोसे बनवण्यासाठी २५ लाख पगार मिळणार आहे तर? तर काय तुम्ही म्हणाला काय राव खेचताय आमची. डोसे बनवण्याचे कोणी २५ लाख देते का? मात्र जर हीच ऑफर तुम्हाला एखाद्या कलाकाराने दिली तर? गोंधळात ना? थांबा थांबा सांगतो.
मराठी मनोरंजनविश्वातील चॉकलेट बॉय आणि सर्वच तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या शशांक केतकरला अमाप फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर देखील तो कमालीचा सक्रिय आहे. सध्या त्याची मुरंबा ही मालिका तुफान गाजत असून त्याची आणि रामाची जोडी देखील खूपच लोकप्रिय होत आहे. मात्र सध्या शशांक त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये असून, तिथे तो शूटिंग करतो आणि मोकळ्या वेळात फिरायला निघतो. अशातच त्याने फिरताना त्याचा एक व्हिडिओ शेअर आहे.
View this post on Instagram
शशांकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लंडनच्या हौन्सला वेस्ट या भागातील मद्रास फ्लेवर्स हॉटेल दिसत आहे. या हॉटेलच्या बाहेर एक जाहिरात लावण्यात आली आहे, त्यात लिहिले आहे की, त्या रेस्टॉरंटमध्ये डोसा शेफची आवश्यकता आहे. डोसा शेफला वर्षाला २८ हजार पौंड पगार मिळणार आहे. आता वार्षिक २८ हजार पौंड म्हणजे भारतीय रुपयाप्रमाणे २८ लाख ६३ हजार १६ रुपये. त्यामुळे शशांक केतकर हा व्हिडीओ शेअर करीत आपल्या चाहत्यांना म्हणाला, “तसे माझे बरे चालले आहे पण, काय म्हणता मग व्हायचे का शिफ्ट?”
शशांकच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “बघा आमच्यासाठी काही होतंय का तिकडे , घरी डोसे बनवण्याचे काम मिळेना. तिथं मिळतंय तर जावं…” काहींनी तर डोसा बनवणाऱ्या व्यक्तीला मिळणारे पेमेंट एकूण आश्चर्य देखील व्यक्त केले आहे. शशांक सध्या ‘कैरी’ सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी
“सलमानसाठी सर्वात सुरक्षित जागा…” सलमान खानच्या सुरक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य