Saturday, September 30, 2023

शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘या’ सवयीने हैराण झालेल्या शशी कपूर यांनी रागाच्या भरात शॉटगन यांना केली होती मारहाण

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी 1969मध्ये आलेल्या ‘प्यार ही प्यार’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. शत्रुघ्न सिन्हा गुरुवारी (9 डिसेंबर) त्यांचा 77 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शान’ चित्रपटाशी निगडित असा एक किस्सा सांगणार जाणून घेऊन, तुम्हीही थक्क व्हाल. शशी कपूर यांना शत्रुघ्न यांचा इतका राग आला की, त्यांनी त्यांना बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. चला या कथेबद्दल जाणून घेऊया.

शत्रुघ्न सिन्हा यांची ‘ही’ सवय नव्हती आवडत
शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म 9 डिसेंबर 1945 रोजी पाटणा, बिहार येथे झाला. शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या दमदार डायलॉगसाठी ओळखले जात होते किंबहुना आजही ओळखले जातात. त्यांना आपल्या चित्रपटाचा भाग असावे असे सर्वांना वाटायचे. शत्रुघ्न सिन्हा सेटवर नेहमीच उशिरा यायचे. त्यांच्या या उशिरा येण्याच्या सवयीमुळे सगळेच त्रस्त झाले होते. खुद्द अमिताभ बच्चन यांनी याबाबत खुलासा केला होता की, शत्रुघ्न घरातून वेळेवर निघायचे, पण सेटवर 5-10 मिनिटे नाही तर 3-3 तास उशिरा पोहोचायचे.

शशी कपूर यांनी बेल्टने केली मारहाण
शत्रुघ्न सिन्हा यांच्या उशिरा येण्याच्या सवयीमुळे शशी कपूर खूप चिडले होते. एके दिवशी ते सेटवर उशिरा पोहोचले तेव्हा शशी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. खरंतर शशी यांना बराच वेळ त्यांची वाट पाहावी लागली, त्यामुळे ते संतापले.

दोघे होते चांगले मित्र
शत्रुघ्न सिन्हा यांनी मार खाताना शशी यांना फटकारले आणि म्हटले की, चित्रपटात तुझी कास्टिंग वेळेवर येण्यासाठी केली आहे आणि माझी टॅलेंटसाठी केली गेली आहे. मग शशी मागे वळून म्हणाले, “बघ किती निर्लज्ज आहे तो.” शत्रुघ्न सिन्हा आणि शशी कपूर खूप चांगले मित्र होते.

कधीही वक्तशीर राहिले नाहीत
अमिताभ बच्चन यांनी एकदा खुलासा केला होता की, शत्रुघ्न सिन्हा कधीच वक्तशीर नव्हते. अमिताभ यांनी सांगितले होते की, “जेव्हा जेव्हा त्यांचा ग्रुप चित्रपट पाहण्याचा विचार करत असत तेव्हा ते म्हणायचे, हो, चला जाऊया. 6 वाजता चित्रपट असायचा आणि संध्याकाळी 6:30 पर्यंत हे भाऊ घरातून बाहेरही पडलेले नसायचे.” त्यामुळे चित्रपट पाहायला ते नेहमी अर्धा तास, पंचेचाळीस मिनिटे उशिरा त्यांना पोहोचायला लागत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ दिग्गज कलाकारांचे सुरुवातीचे वेतन ऐकूण व्हाल थक्क, अगदी शुन्यातून केली होती सुरुवात
जेव्हा शत्रुघ्न सिन्हा स्वतःच्याच लग्नात पोहचले होते उशिरा, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा

हे देखील वाचा