Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘मी भाग्यवान आहे की माझी मुले..’, आर्यन खान प्रकरणावर शत्रुघ्न सिन्हांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

‘मी भाग्यवान आहे की माझी मुले..’, आर्यन खान प्रकरणावर शत्रुघ्न सिन्हांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अं’मली पदार्थ प्रकरणी २ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आता जवळपास महिनाभरानंतर आर्यन खान घरी परतला आहे. अं’मली पदार्थ प्रकरणात आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूड सेलिब्रिटी शाहरुख खानच्या समर्थनात उतरले, तर कोणी तिखट प्रतिक्रिया दिली. यावर आता शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांची तीन मुले सोनाक्षी, लव आणि खुश हे अं’मली पदार्थ घेत नाहीत याचा त्यांना आनंद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न आर्यनला एनसीबीने अटक केल्याबद्दल बोलले आहेत. त्याचवेळी त्यांनी सांगितले की, सेलिब्रिटींसाठी त्यांच्या मुलांना योग्य दिशा दाखवणे आव्हानात्मक असते. ते म्हणाले की, “आव्हान असो वा नसो, असे असले पाहिजे. मी सुरुवातीपासून विश्वास ठेवतो, मी उपदेश करतो आणि आचरण करतो. मी तंबाखू विरोधी अभियान करतो. मी नेहमी अं’मली पदार्थांना नाही म्हणतो.”

तिन्ही मुलांचे केले कौतुक
शुत्रघ्न पुढे म्हणाले की, “आज मी या बाबतीत स्वतःला भाग्यवान समजतो की, माझी मुले लव, कुश आणि मुलगी सोनाक्षी आहेत. माझ्या मुलांबद्दल मी अभिमानाने सांगू शकतो की, त्यांचे पालनपोषण इतके चांगले झाले आहे की, त्यांनी हे कधीही ऐकले नाही, पाहिले नाही नाही किंवा त्यांना अशी कोणतीही सवय नाही.”

शत्रुघ्न पुढे म्हणाले की, ”इतर पालकांनी आपली मुले एकटी राहणार नाहीत, चुकीच्या संगतीत पडणार नाहीत किंवा ते चुकणार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यांनी त्यांच्या मुलांसोबत किमान एक वेळ जेवण केले पाहिजे.”

आर्यनच्या केसवर बोलले ‘ही’ गोष्ट
शत्रुघ्न म्हणाले की, “आर्यन शाहरुख खानचा मुलगा आहे, म्हणून त्याला माफ केले जाऊ नये. मात्र त्याला टार्गेट करण्याचा अधिकार कोणालाही नाही.”

आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तो ५ दिवस एनसीबीच्या कोठडीत होता आणि त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आता आर्यनची शनिवारी आर्थर रोड तुरुंगातून जामीनावर सुटका झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! आर्यन खान आर्थर रोड कारागृहातून बाहेर, लवकरच होणार मन्नतवर रवाना

-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी

-हीच ती वकिलांची टीम ज्यांनी आर्यनला मिळवून दिला जामीन, जाणून घ्या या टीममधील सदस्यांबद्दल

हे देखील वाचा