डान्स रियॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या आगामी भागात विशेष पाहुणी म्हणून रवीना टंडन दिसणार आहे. या भागाचे नाव ‘रवीना स्पेशल’ असणार आहे. स्पर्धक रवीनासमोर एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्स देतील. सोबतच डान्स गुरूंना श्रद्धांजली अर्पण करतील. याशिवाय शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडन दोघीही रंगमंचावर एकत्र परफॉर्मन्स करतील. या दोघींचा एक डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओ होतोय व्हायरल
दोघीही ‘चुराके दिल मेरा’ या चार्टबस्टर गाण्यावर डान्स करताना दिसतील. यासोबतच दोघी ‘तू चीज़ बडी है मस्त मस्त’ वर देखील डान्स करताना दिसतील. ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे निर्माते प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. निर्माते प्रत्येक आठवड्याच्या शेवटी एक लोकप्रिय सेलिब्रिटी शोमध्ये विशेष परीक्षक म्हणून आणत आहेत. काही दिवसांपूर्वी फराह खानने स्टेजवर एक खास परफॉर्मन्स दिला होता. आता रवीना विशेष पाहुणी म्हणून दिसणार आहे. (actor-shilpa-shetty-kundra-raveena-tandon-chura-ke-dil-mera-hook-step-video-viral)
अश्लिल चित्रपट प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने डान्स रियॅलिटी शो ‘सुपर डान्सर ४’च्या सेटमधून ब्रेक घेतला होता. दरम्यान, शोमध्ये शिल्पा शेट्टीच्या जागी इतर अनेक कलाकार आले आणि तिची उणीव भरून काढली. शिल्पा शेट्टी ३ आठवड्यांनंतर ‘सुपर डान्सर ४’च्या सेटवर परतली. शिल्पा शेट्टीच्या अनुपस्थितीत, संगीता बिजलानी, जॅकी श्रॉफ, टेरेन्स लुईस, सोनाली बेंद्रे, मौसमी चॅटर्जी, करिश्मा कपूर पाहुणे म्हणून आले.
सध्या अश्लिल चित्रपट प्रकरणात राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहे. राज कुंद्रावरील आरोपांनंतर शिल्पा शेट्टीला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले आहे. शिल्पा शेट्टीने गुन्हे शाखेला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, तिचा राज कुंद्राच्या कंपनीशी काहीही संबंध नाही, असे तिने स्पष्ट केले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’
-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज