Saturday, June 29, 2024

अजय देवगण बरोबर काम केलेला कलाकार लढतोय जीवन-मरणाची लढाई, उपचारासाठी पैशांची…

२०२० हे वर्ष इतकं नकारात्मक गेलं आहे की प्रत्येक जण त्याच्या आयुष्यातून हे वर्ष वगळण्याचा प्रयत्न करेल. परंतु आपण कितीही ठरवलं तरीदेखील असं करू शकणार नाही. विशेषतः बॉलिवूडसाठी हे वर्ष खूपच वाईट गेलं. यावर्षी बॉलिवूडची इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत, संगीतकार वाजीद खान, जगदीप जाफरी यांच्यारूपात फारच मोठी हानी झाली. अनेक कलाकार आजही रुग्णालयात उपचार घेत आहेत. काहींना हा खर्च झेपतोय तर काहींना नाही.

अजय देवगण स्टारर २००८ साली आलेल्या हल्लाबोल सिनेमातील अभिनेते तसेच सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनचे विद्यमान सदस्य शिवकुमार वर्मा हे क्रॉनिक ऑबस्ट्रेक्टिव पल्मोनरी डिजीज या आजाराशी झुंज देत आहेत. हा एक फुफ्फुसांचा आजार असल्याने त्यांना कोव्हिड १९ ची सुद्धा लागण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. त्यांना हा उपचारांचा खर्च परवडत नाही आहे.

यामुळे सिंटाने ट्विटरवर त्यांच्या या आजाराची माहिती देत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडे त्यांच्यासाठी आर्थिक मदत मागितली आहे. असोसिएशनने आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये लिहिलं आहे, “मदतीसाठी अर्जंट कॉल. सिंटाचे सदस्य शिवकुमार वर्मा हे सीओपीडी या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. तसेच त्यांना कोव्हीडची लग्न झाल्याचाही संशय आहे. त्यांना हॉस्पिटलच्या खर्चांसाठी पैशांची नितांत गरज आहे. आम्ही आपल्याला विनंती करत आहोत की कृपया आपल्याला जमेल तशी मदत करावी.”

असोसिएशनकडून ही पोस्ट ट्विटरवर अनेकदा केली गेली आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या सेलिब्रिटींना त्यात टॅग केलं गेलं आहे. ज्यात अमिताभ बच्चन, सलमान खान, विद्या बालन, मनोज जोशी, अक्षय कुमार यांचा देखील समावेश आहे. माध्यमांशी बोलताना सिंटाच्या अमित बहल यांनी सांगितलं की शिवकुमार हे असोसिएशचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांच्या खात्यात सध्याच्या घडीला अमित बहल यांनी ५०,००० रुपये टाकले आहेत परंतु ते अपुरे पडत आहेत. वर्मा यांच्या आजाराचं गांभीर्य लक्षात घेता त्यांना ३ ते ४ लाख रुपये रकमेची गरज भासणार आहे. शिवकुमार वर्मा यांनी हल्लाबोल तसेच बाजी जिंदगी की या सिनेमात देखील काम केलं आहे. शिवाय त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.

हेही वाचणं आहे महत्त्वाचं
बॉलिवूड अभिनेत्रींचा अजब कारभार! विवाहित पुरुषांसोबत बांधली लगीन गाठ
ब्रेकअप, घटस्फोट आणि पुन्हा लग्न, बॉलिवूडकरांची नात्यांची खिचडी
बॉलिवूड अभिनेत्रींच्या हटके लव्ह स्टोरी, कमी वयाच्या नायकांसोबत बांधली लगीनगाठ    
कलाकार आणि त्यांच्या अजब सवयी; वाचून तुम्ही ही म्हणाल असं कुठं असतं का?

हे देखील वाचा