Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड ‘सर्वांत महत्वाचे आहे की…’, म्हणत श्रेयस तळपदेने शेअर केला पत्नीसोबतचा फोटो; पाहायला मिळाली उत्तम बॉंडिंग

‘सर्वांत महत्वाचे आहे की…’, म्हणत श्रेयस तळपदेने शेअर केला पत्नीसोबतचा फोटो; पाहायला मिळाली उत्तम बॉंडिंग

सिनेसृष्टीत बरेच प्रतिभावान कलाकार आहे, त्यातलाच एक आहे अभिनेता श्रेयस तळपदे. त्याने बरेच हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभिनेता रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो सतत आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करून, चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनत असतो. नुकताच त्याने शेअर केलेला एक फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

श्रेयसने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो त्याच्या पत्नी दीप्तीसोबत दिसला आहे. त्यांचा हा सेल्फी क्लिक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. या फोटोवरून या जोडप्यामधील बॉंडिंग कसे आहे हे सहज लक्षात येऊ शकते. हा फोटो शेअर करत श्रेयसने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सर्वांत महत्वाचे आहे हे की, आम्ही एकमेकांना हसवतो. खरंच, स्वाईप करून बघा.”

श्रेयस आणि दीप्ती यांनी लव्ह मॅरेज केले आहे. जेव्हा श्रेयस हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता होता, तेव्हा दीप्ती कॉलेजमध्ये शिकत होती. तेव्हा कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी, दीप्ती त्याला पहिल्यांदाच भेटली होती. त्यानंतर कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही दिवसांनी ते रेशीमगाठीत अडकले. या जोडप्याला एक गोंडस मुलगी देखील आहे.

श्रेयसच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने छोट्या पडद्यापासून मोठा पडदा गाजवला आहे. त्याच्या हिट चित्रपटांमध्ये ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘हाऊसफुल्ल २’, ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटांचा समावेश आहे. तो ‘इकबाल’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी विशेष ओळखला जातो. श्रेयसने ‘पछाडलेला’, ‘सावरखेड’, ‘आई शप्पथ’, ‘बायो’, ‘सनई चौघडे’, ‘पोश्टर बॉईज’, ‘बाजी’ या मराठी चित्रपटामध्ये अभिनय केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा