Wednesday, July 3, 2024

मराठमोळा श्रेयस तळपदे करतोय ‘या’ चित्रपटाचे दिग्दर्शन; दाखवणार सरकारी नोकरी करणाऱ्या कुटुंबाची कहाणी

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने समस्त सिनेरसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत जे अभिनयाच्या क्षेत्रातून दिग्दर्शनाकडे वळले आहेत. काही कलाकार दिग्दर्शनामध्ये आपला हात आजमावतात. आतापर्यंत अनेक कलाकारांनी अभिनयानंतर दिग्दर्शनात हात आजमावला आहे. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याच्या नावाचा समावेश झाला आहे. या अभिनेत्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. मग ते हिंदी असो किंवा मराठी.

सध्या दिग्दर्शन क्षेत्राकडे वळणाऱ्या अभिनेत्याचे नाव श्रेयस तळपदे असे आहे. श्रेयस हा सुभाष घई यांच्या ‘इकबाल’ या चित्रपटातून प्रसिद्ध झाला होता. श्रेयसने या अगोदरही एक चित्रपट दिग्दर्शित केला होता. अभिनेता सनी देओल आणि अभिनेता बॉबी देओल यांचा ‘पोस्टर बॉईज’ हा चित्रपट श्रेयसने दिग्दर्शित केला होता. त्याचबरोबर आता दुसऱ्यांदा तो एका चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. त्याचा दुसरा चित्रपट ‘सरकार की सेवा में’ हा आहे.

या चित्रपटाची शूटिंग मुंबईतील त्रिमूर्ती स्टुडिओमध्ये सुरू आहे. यामध्ये श्रेयस तळपदे हा अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एका खऱ्या जीवनातील घटनेने प्रेरित आहे. जो विनोदी पद्धतीने सामाजिक संदेश देखील देणार आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये चित्रपटाचे काही चित्रीकरण करण्यात आले आहे.

अभिनेता श्रेयस तळपदेच्या मते, ही कथा एका छोट्या शहरातील एका मुलाची आहे. ज्याचे वडील शासकीय सेवेत आहेत आणि त्याचा मुलगाही सरकारी नोकरी करावी अशी त्याची इच्छा आहे. मात्र, दुर्दैवाने त्याला सरकारी नोकरी करण्याची संधी मिळत नाही. त्यानंतर तो एक कार ड्रायव्हर होतो.

त्याचबरोबर या चित्रपटात भली मोठी कलाकारांची फौज आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे व्यतिरिक्त चेतना पांडेय, श्रद्धा जायसवाल, सुधीर पांडेय, अनिल चरणजीत, निखिल माथूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर श्रेयसच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो सध्या झी मराठी वाहिनीवर ‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

-अभिज्ञा भावेचे स्टायलिश कॉर्पोरेट लूकमधील फोटो व्हायरल, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भारीच की!’

-गुलाबी साडी नेसून आर्चीने घेतली ‘मिरर सेल्फी’; चाहत्यांना भावतोय अभिनेत्रीचा सोज्वळ अंदाज

हे देखील वाचा