सिद्धार्थला होती आलिशान कार अन् बाईकची आवड; किंमत वाचून तुम्हीही म्हणाल, ‘बापरे बाप!’

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील कूपर रुग्णालयात निधन झाले. सिद्धार्थने आपल्या अभिनयाने या क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण केले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थने रात्री काही औषध घेतले होते, त्यानंतर तो झोपला, पण तो सकाळी उठलाच नाही. त्यावेळी कुटुंबाने त्याला रुग्णालयात नेले. जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सिद्धार्थला अनेक गोष्टीचा छंद होता. त्यातील एक म्हणजे आलिशान कार आणि बाईक होय.

सिद्धार्थला रायडिंग करायची खूप आवड होती. सिद्धार्थकडे बीएमडब्ल्यू एक्स ५ ही कार आहे. ज्याची किंमत ७६.५० ते ८८ लाख रुपये आहे. एसयूव्ही ३ श्रेणींमध्ये येते. (Actor Siddharth Shukla was a bike lover, he loved these cars)

सिद्धार्थच्या गाडीचे विशेष
सिद्धार्थच्या एक्स ५ कारचा रंग काळ्या नीलमणी पेंट फिनिशमध्ये होता. याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला त्यात ३.० लीटर व्ही६ पेट्रोल आणि डिझेल इंजिन मिळते. याशिवाय इलेक्ट्रिक टेलगेट, ऍम्बियंट लायटिंग, पॅनोरॉमिक सनरूफ, ४ झोन ऑटोमॅटिक एअर कंडिशनर, हेड्स अप डिस्प्ले, १२.३-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १२.३-इंच बीएमडब्ल्यू iDrive टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ३डी नेव्हिगेशन मॅप्स, व्हॉईस कंट्रोल आणि व्हायरलेस स्मार्टफोन इंटीग्रेशन सोबत मिळते.

हार्लेचे होते वेडे
दिवंगत अभिनेता सिद्धार्थला बाईक रायडिंगचीही खूप आवड होती. तो अनेकदा मुंबईत बाईक चालवताना दिसायचा. त्याला भारतात सर्वात जास्त आवडलेली हार्ले डेव्हिडसन बाईक होती. सिद्धार्थला बॉबर स्टाईल क्रूझर बाईक चालवायला खूप आवडायची.

https://twitter.com/anuradha_9999/status/1347188894995865606

या बाईकची किंमत १६.७५ लाख रुपये आहे आणि ती विविड ब्लॅकसह, बिलियर्ड रेड आणि डेडवुड ग्रीन डेनिम्स या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये १८६८ सीसीचे इंजिन आहे. जे ११४ व्ही ट्विन इंजिन आहे. हे ५०२० आरपीएमवर ९३ बीएचपीची पॉवर देते, तर ३५०० आरपीएमवर १५५ एनएमचे टॉर्क देते. इंजिन ६ स्पीड गिअरबॉक्सने जोडलेले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

Latest Post