Saturday, April 19, 2025
Home साऊथ सिनेमा समंथा अन् नागा चैतन्यचा घटस्फोट होताच, एक्स बॉयफ्रेंडचे ट्वीट व्हायरल; म्हणाला, ‘फसवणूक करणाऱ्यांची…’

समंथा अन् नागा चैतन्यचा घटस्फोट होताच, एक्स बॉयफ्रेंडचे ट्वीट व्हायरल; म्हणाला, ‘फसवणूक करणाऱ्यांची…’

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील रोमँटिक जोडपे असलेल्या समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्यने शनिवारी (२ ऑक्टोबर) मोठा निर्णय घेत चाहत्यांना धक्का दिला. त्यांनी ४ वर्षांचे नाते संपवत घटस्फोटाची घोषणा केली. यामुळे चाहते खूपच नाराज आहेत. मागील काही काळापासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होती. अखेर त्यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. दरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार सिद्धार्थचे ट्वीट चर्चेचा विषय बनले आहे.

नेमकं काय आहे सिद्धार्थचे ट्वीट?
समंथा आणि नागा चैतन्यने घटस्फोटाची घोषणा करताच, काही तासांनंतर पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड सिद्धार्थने एक ट्वीट केले. यानंतर नेटकऱ्यांनीही हे घटस्फोटाच्या बातम्यांशी जोडले. सिद्धार्थने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “मी आपल्या शाळेतील शिक्षकांकडून सर्वप्रथम ही गोष्ट शिकली होती की, फसवणूक करणाऱ्यांची कधीच भरभराट होत नाहीत. तुम्ही काय शिकलात?” (Actor Siddharth Tweet Viral After The News of Samantha And Naga Chaitanyas Separation)

नेटकऱ्यांनी सिद्धार्थला दिला सल्ला
सिद्धार्थने हे ट्वीट करताच नेटकऱ्यांनी हे घटस्फोटाशी जोडले. यानंतर एकच चर्चा सुरू झाली. अनेक चाहत्यांनी या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली. काहींनी सिद्धार्थला आपल्या कामाशी काम ठेवण्याचा सल्लाही दिला.

असे असले, तरीही अनेक युजर्सनी याबाबतही चर्चा केली की, या ट्वीटचा खरंच घटस्फोटाशी काही संबंध आहे की नाही. एका युजरने आपला राग व्यक्त करत म्हटले की, “लाज वाटू दे. यावेळी असे करण्याची गरज काय आहे? आरशासमोर उभा राहून स्वत:ला हा प्रश्न विचार.”

https://twitter.com/crybabywut/status/1444310316771205124?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1444310316771205124%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fentertainment%2Fregional-cinema%2Fsiddharths-tweet-went-viral-after-the-news-of-samantha-and-naga-chaitanyas-separation-1977038

पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थने केला होता परफॉर्मन्स
समंथा आणि सिद्धार्थच्या कनेक्शनबद्दल बोलायचं झालं, तर काही वर्षांपूर्वीपर्यंत दोघेही एक लव्हबर्ड्स होते. जेव्हा दोघेही एकमेकांना डेट करत होते, तेव्हा सिद्धार्थने शोमध्ये अनेक गाण्यांवर परफॉर्मन्स केला होता आणि समंथा प्रेक्षकांमध्ये बसून लाजताना दिसत होती.

समंथा आणि नागा चैतन्य यांची लव्हस्टोरी
नागा आणि समंथाच्या लव्ह स्टोरीला सन २०१० मध्ये आलेल्या ‘ये माया चेसावे’ चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सुरुवात झाली होती. यानंतर त्यांनी ४ वर्षांपूर्वी म्हणजेच सन २०१०मध्ये साखरपुडा केला होता. पुढे दोघांनीही ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी गोव्यात लग्नगाठ बांधली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दोनशे कोटी सोडा, समंथाला नाते संपवण्यासाठी घ्यायचा नव्हता एकही रुपया; मग अभिनेत्रीला काय हवं होतं?

-‘पती- पत्नीमध्ये जे काही होते ते…’, म्हणत नागा अन् समंथाच्या घटस्फोटावर नागार्जुन यांची मोठी प्रतिक्रिया

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

हे देखील वाचा