बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार जोडपे आहेत, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर असे वाटते की, ते एकमेकांसाठीच बनले आहेत. मात्र, यामध्येही असे अनेक कलाकार असतात, जे आपल्या नात्याचा मोकळेपणाने खुलासा करत नाहीत. असे असले तरीही त्यांच्या प्रेमाची चर्चा सर्वदूर पसरलेली असते. असेच बॉलिवूडमधील एक जोडपे म्हणजे प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी होय. या दोघांच्याही अफेअरचे किस्से नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
इंडस्ट्रीत होतेय सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची चर्चा
सिद्धार्थ आणि कियारा यांनी अद्याप आपल्या नात्याची अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही. मात्र, दोघे नेहमी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. अशातच आता वृत्त समोर येत आहे की, लवकरच दोघेही लग्न करणार आहेत. याबाबत नुकतेच अभिनेत्याला हा प्रश्न विचारण्यात आला की, तो लग्न केव्हा करणार आहे? यावर त्याने दिलेले प्रत्युत्तर सध्या चर्चेत आहे. (Actor Sidharth Malhotra Kiara Advani Is Ready To Tie Knot Soon Actor Gave Reply On Rumours)
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थला विचारण्यात आले की, तो लग्न केव्हा करणार आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, ज्योतिषी नसल्यामुळे त्याला माहिती नाहीये. तो म्हणाला की, “याची कोणतीही टाईमलाईन नाही. मात्र, हे जेव्हा होईल, तेव्हा योग्य होईल.” याव्यतिरिक्त एका मुलाखतीत त्याला कियाराबाबत कोणती गोष्ट चांगली वाटते आणि कोणती गोष्ट बदलावी वाटेल?, असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, “कियाराची सर्वात चांगली बाब म्हणजे कॅमेरा ऑफ होताच ती एक सामान्य व्यक्तीप्रमाणे व्यवहार करू लागते. असे नाही की, ती अभिनेत्री आहे, तर नेहमी त्याचप्रकारे राहील. ती ऑफ कॅमेरा खूपच नम्र राहते, जे मला खूप आवडते.” दुसरीकडे कियाराच्या बदलाव्या वाटणाऱ्या गोष्टीबद्दल सांगताना तो म्हणाला की, “असे म्हणणे चुकीचे ठरेल की, तिच्यात काही बदलले पाहिजे. ती एक सर्वोत्तम अभिनेत्री आहे. तिच्यात कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.”
विशेष म्हणजे यापूर्वी सर्वांच्या आवडीचा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कियारा आडवाणीला विचारण्यात आले होते की, तिचा बॉयफ्रेंड आहे का? यावर सुरुवातीला ती काही बोलू शकली नव्हती. मात्र, त्यानंतर तिने म्हटले होते की, “मी थेट लग्न करणार आहे. तसेच मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत तेव्हाच बोलेल, जेव्हा माझे लग्न होईल.” कियाराच्या या वक्तव्यावर सुपरस्टार अक्षय कुमार हसत हसत म्हणाला होता की, “ही तत्व बाळगणारी मुलगी आहे.”
नुकताच सिद्धार्थ आणि कियाराचा ‘शेरशाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला जबरदस्त पसंती मिळाली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-करीना कपूरने केला परफेक्ट फॅमिली फोटो शेअर, समुद्र किनारी दिसले ‘सैफिना’चे कुटुंब
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी