Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची गुरुवारी (२ सप्टेंबर) धक्कादायक बातमी समोर आली. सिद्धार्थाचे अंतिम संस्कार शुक्रवारी करण्यात आले. चाहत्यांसोबतच कलाकार देखील सिद्धार्थच्या निधनाने हैराण झाले आहेत. दरम्यान, रेसलर आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनाने देखील सिद्धार्थ शुक्लासाठी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

जॉनची इंस्टाग्राम पोस्ट
जॉन सीनाने शनिवारी (४ सप्टेंबर) सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्लाचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने सिद्धार्थचा ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. जॉनने त्याच्या पोस्टसह कोणतेही कॅप्शन लिहिले नाही, तरी अनेक बॉलिवूड कलाकारांनी सिद्धार्थसाठी जॉनची श्रद्धांजली पोस्ट लाईक केली आहे.

चाहते आणि कलाकार यांचे तुटलेले हृदय
चाहते अजूनही सिद्धार्थच्या मृत्यूवर विश्वास ठेवू शकत नाहीत. सिद्धार्थने परत यावे अशी प्रत्येक हृदयाची इच्छा आहे. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून, काही चाहत्यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याशिवाय अनेक कलाकारांनी आपले दुःख व्यक्त केले आहे.

मुंबईत जन्मलेला सिद्धार्थ शुक्ला
सिद्धार्थ शुक्लाचा जन्म १२ डिसेंबर १९८० रोजी मुंबई येथे झाला. जेव्हा सिद्धार्थ मॉडेलिंगच्या दुनियेत नशीब आजमावत होता, तेव्हा त्याने वडिलांना गमावले. वडिलांच्या निधनानंतर सिद्धार्थने स्वतःला थांबू दिले नाही किंवा हार मानली नाही. सिद्धार्थ शुक्लाने इंटिरियर डिझायनिंगमध्ये बॅचलर पदवी मिळवली होती. तर त्याने काही वर्षे त्याच व्यवसायात कामही केले होते. २००४ मध्ये, सिद्धार्थ ग्लॅड्रॅग्स मॅनहंट आणि मेगामोडेल स्पर्धेचा उपविजेता होता आणि त्यानंतर ‘रेशम का रुमाल’ व्हिडिओमध्ये दिसला होता.

शुक्लाचे अभिनयात पदार्पण
सिद्धार्थ शुक्लाने २००८ मध्ये सोनी टीव्हीच्या ‘बाबुल का आंगण छुटे ना’ यातून टीव्हीवर पदार्पण केले. सिद्धार्थने शोमध्ये शुभ राणावतची भूमिका साकारली होती. फेब्रुवारी २००९ मध्ये शो संपला. यानंतर, सिद्धार्थ शुक्ला २००९ मध्येच टीव्ही शो ‘जाने पेहचाने से ये अजनबी’ मध्ये दिसला. या शोमध्ये सिद्धार्थने वीरची भूमिका साकारली होती. या शोनंतर, सिद्धार्थ ‘हॉरर शो आहट’च्या काही भागांमध्ये देखील दिसला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-TMKOC: जेठालाल झाला गंभीर जखमी, तर ‘यामुळे’ पोलिसांना करावी लागली गोकुळधाम सोसायटीच्या लोकांना अटक

-अरेरे! प्रार्थना अन् मायराच्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय? नेटकऱ्यांचाही उमटतायेत प्रतिक्रिया

-‘मैं नहीं नाचती, मेरा दिल नाचता है…’, मस्तानी बनली मराठमोळी मानसी नाईक; पाहून पती म्हणतोय…

हे देखील वाचा