Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘यामुळे’ देवोलीना भट्टाचार्जीवर भडकले सिद्धार्थ शुक्लाचे चाहते, स्पष्टीकरण देत अभिनेत्री म्हणाली…

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी तिच्या बिनधास्त अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. त्याचवेळी, अलीकडेच ती तिच्या एका पोस्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्याखाली आली आहे. तिच्या एका पोस्टमध्ये तिने ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शोबद्दल एक पोस्ट केली होती. ज्यामुळे सिद्धार्थ शुक्लाचे चाहते चिडले आणि त्यांनी तिला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. मात्र, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत संतप्त चाहत्यांना स्पष्टीकरण दिले आहे. देवोलीना म्हणते की, तिचे विधान सिद्धार्थसाठी नव्हते.

सिद्धार्थचे चाहते भडकले
‘बिग बॉस १५’मध्ये जय भानुशाली आणि प्रतीक यांच्यात झालेल्या वादानंतर बिग बॉसच्या घरात तोडफोड झाली. प्रतीकमुळे घरातील सर्व सदस्य नॉमिनेट झाले. यावर प्रतिक्रिया देताना देवोलीनाने पोस्ट केली आणि ‘बिग बॉस १३’चा संदर्भ देत लिहिले की, “मी असे म्हणत नाही की मालमत्तेचे नुकसान करणे ही चांगली गोष्ट आहे. पण ती ऍक्शनची रिऍक्शन होती आणि मला आठवते की, आमच्या सीझनमध्येही असेच घडले होते. आई-वडिलांवर शिवी दिल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आणि ती व्यक्ती पहिल्या २ मध्ये होती आणि आज तो देशातील तरूणांची धडकन आहे.”

यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अशी प्रतिक्रिया करण्यास सुरुवात केली की, देवोलीना सिद्धार्थ शुक्लावर टीका करत आहे जो आता या जगात नाही. एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना लिहिले की, “ती सिद्धार्थ शुक्लाबद्दल बोलत आहे का? देवो तुला लाज वाटली पाहिजे.”

https://twitter.com/NahyanCr7/status/1445625370997186568?s=20

शेवटी देवोलीनाला पुढे यावे लागले, तिने तिची भूमिका स्पष्ट केली. ती म्हणाली की, “तु कोणत्या शाळेतून आला आहेस? माध्यमांच्या नावावर किती अपमान आहे.”

‘बिग बॉस १३’मध्ये सिद्धार्थ शुक्ला विजेता होता आणि असीम रियाज उपविजेता ठरला. या शोमध्ये या दोघांमधील मैत्री व भांडणे खूप चर्चेत असायची.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा