Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड राजकारणात येण्याबद्दल सोनू सूदने सोडले मौन, लवकरच करणार पक्षाची घोषणा

राजकारणात येण्याबद्दल सोनू सूदने सोडले मौन, लवकरच करणार पक्षाची घोषणा

अभिनेता सोनू सूदचे (Sonu Sood) नाव घेताच तो जनतेसाठी आणि त्याच्या चाहत्यांच्या मदतीसाठी किती धडपड करतो हे डोळ्यासमोर येते. त्याला गरिबांचा ‘देवदूत’ देखील म्हटले जाते. नुकतीच सोनूची केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीत भेट झाल्यापासून तो राजकारणात प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्याचवेळी पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे. खरं तर, सोनूने एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, त्याची बहीण मालविका आणि तिचे कुटुंब येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या रणनीतीसह पक्षाची घोषणा करतील. सोनू येत्या १० दिवसांत आपल्या पक्षाची घोषणा करणार आहे. त्याची बहीण मालविका हिने पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्याची आधीच घोषणा केली आहे.

पत्रकार परिषदेत सोनू म्हणाला की, तो मोगासाठी काम करत आहे आणि पुढेही करत राहणार आहे. तो स्वत:चा पक्ष काढणार की, बहिण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे सोनूने अद्याप जाहीर केलेले नाही. कोरोनाच्या काळात लोकांसाठी काम करणाऱ्या नेत्याची प्रतिमा लोकांना त्याच्यामध्ये दिसली.

चांगल्या लोकांना मतदान करा, तरच देशात परिवर्तन घडेल, असे आवाहनही त्याने जनतेला केले. सोनू सूद ४ जानेवारी रोजी गरजू मुली आणि वर्कर्सना १००० सायकलींचे वाटप करणार आहेत. मुली पायी शिक्षणासाठी जाताना पाहून वाईट वाटते, असे त्याचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात सोनूने पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची भेट घेतली होती.

अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर मिळाल्या पाहायला
एका युजरने लिहिले की, “सोनू राजकीय पक्षात सामील होणार नाही, तर अपक्ष म्हणून लढून थेट पंतप्रधान बनेल. #SonuSood काहीही करू शकतो. त्यांच्यामुळेच आज आपण जिवंत आहोत अन्यथा #Covid आपल्याला दुसऱ्या जगात घेऊन गेले असते.” दुसर्‍या युजरने लिहिले की, “सोनू सूद एक अशी व्यक्ती आहे. जी स्वतःचा नाही, तर इतरांचा चांगला विचार करते. सोनू सूद हा भारताचा रत्न आहे.”

सोनू सूद सामान्य लोकांना सतत मदत करताना दिसतो. तो लॉकडाऊन दरम्यान आणि आता देखील लोकांना सतत मदत करत आहे. त्याच्या या सवयीमुळे त्याला लाखो लोक पसंत करतात. त्याचे चाहते कधी त्याची तुलना सुपरहिरोशी करतात, तर कधी त्याला देवाचा दर्जा देतात.

हेही वाचा-

हे देखील वाचा