Saturday, July 26, 2025
Home बॉलीवूड आयकर विभागाने केलेल्या आरोपांवर प्रथमच सोनू सूदने सोडले मौन, पोस्ट करत म्हणाला…

आयकर विभागाने केलेल्या आरोपांवर प्रथमच सोनू सूदने सोडले मौन, पोस्ट करत म्हणाला…

मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाची लाट पसरली आहे. या काळात अनेक लोक अडचणीत सापडले होते. भारतात लॉकडाऊन केल्याने अनेक लोकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले. तर काही कामासाठी स्थलांतरित झालेली लोक अडकून पडली होती. याच दरम्यान एक मदतीचा हात पुढे आला. तो अडचणीत असलेल्या लोकांचा देवदूत बनून सर्वांसमोर आला. तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद. कोरोना काळात सोनू सूदच्या मदतीमुळे अनेक लोकांवरील संकट दूर झाले. याच दरम्यान सर्वत्र सोनू सूदचीच चर्चा सुरू होती.

सोनू सूदने अनेक लोकांना सर्व प्रकारे मदत केली. परंतु आता सोनू सूदवर एक भले मोठे संकट येऊन ठेपले आहे. मागील काही दिवसांपूर्वीच सोनू सूदच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला होता. तीन दिवस या विभागाचे सर्वेक्षण सुरू होते. आयकर विभागाचा असा दावा आहे की, त्यांना सोनू सूदच्या घरातून तब्बल २० कोटींचे कर चोरीचे कागदपत्र मिळाले आहेत. परंतु आयकर विभागाने अजूनही अधिकृतपणे सर्वांसमोर हे पुरावे सादर केले नाहीत. याच दरम्यान सोनू सूदने कोणती ही प्रतिक्रिया दिली नव्हती. (actor sonu sood has broken his silence amid the ongoing investigations into his finance)

मात्र आता अभिनेता सोनू सूदने चार दिवसांनंतर आपले मौन सोडले आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने लिहिले आहे की, “प्रत्येक वेळी सगळं सांगण्याची गरज नाही. वेळच स्वतः सगळं सांगेल. माझ्या घरी आलेल्या काही पाहुण्यांमुळे मी गेल्या ४ दिवसांपासून लोकांची सेवा करू शकलो नाही, पण आता मी पुन्हा लोकांच्या सेवेत परतलो आहे.”

सोनू सूद पुढे म्हणाला की, “माझ्या क्षमतेनुसार मी भारतातील लोकांच्या भल्यासाठी काम करण्याचा संकल्प केला आहे. मी माझ्या फाउंडेशनमध्ये जमा केलेल्या पैशांच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत गरजू लोकांचे प्राण वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. मी अनेक प्रसंगी मोठ्या ब्रँडना माझ्या मानधनाच्या बदल्यात लोकांसाठी चांगले काम करण्यास सांगितले आहे. माझा हा प्रवास चालू राहील.” त्याचबरोबर त्याने शेवटी लिहिले आहे की, “कर भला, तो हो भला, अंत भले का भला.”

खरं तर, मागील काही दिवसांपूर्वीच सोनू सूद वादात अडकला होता. आयकर विभागाने मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्रामसह २८ ठिकाणी छापे टाकून ३ दिवसांनी २० कोटींचा कर चुकवला असल्याचा दावा केला आहे. आयकर विभागाने असा दावा केला की, “तपासात असे उघड झाले आहे की, सोनू सूदने परदेशी देणगीदारांकडून २.१ कोटींचा ना-नफा निधी गोळा केला, जो अशा व्यवहारांना नियंत्रित करणाऱ्या कायद्याचे उल्लंघन आहे.”

आयकर विभागाने त्याच्या चॅरिटी ट्रस्टवर परदेशी योगदान कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. आयकर विभागाच्या या खुलास्यानंतर, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) येत्या काळात हे प्रकरण देखील दाखल करू शकते. त्याचबरोबर आयकर विभागाने लखनऊमधील एका इन्फ्रा कंपनीवर छापा टाकल्याचे सांगितले आहे. मुंबईतील सोनू सूदची या कंपनीत भागीदारी आहे आणि या कंपनीने मोठ्या प्रमाणावर आयकर टाळला आहे. कंपनीच्या दिल्ली, जयपूर, लखनऊ आणि गुरुग्राम येथील ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि छाप्यांदरम्यान १ कोटी ८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ११ लॉकर्स देखील सापडले आहेत. या कंपनीच्या १७५ कोटी रुपयांच्या व्यवहारावर आयकर विभागालाही संशय आहे. या प्रकरणाचा अजूनही तपास सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ओह लडकी ऑंख मारे! उर्वशी रौतेलाच्या नजरेच्या बाणाने चाहते झाले पुरते घायाळ

-सतत बदलणाऱ्या मूडमध्ये ‘हा’ आहे बेबोचा ‘फॉरएव्हर मूड’; पोस्ट शेअर करून दिली माहिती

-‘टायगर ३’साठी शूट केले जातायेत जबरदस्त ऍक्शन सीन्स; तुर्कीनंतर आता ‘या’ देशात होणार चित्रपटाची शूटिंग

हे देखील वाचा