Saturday, June 14, 2025
Home बॉलीवूड सोनू सूदकडे युजरने केली तब्बल १ करोड रुपयांची मागणी; मजेदार प्रतिक्रिया देत अभिनेता म्हणाला…

सोनू सूदकडे युजरने केली तब्बल १ करोड रुपयांची मागणी; मजेदार प्रतिक्रिया देत अभिनेता म्हणाला…

कोरोना महामारीत अभिनेता सोनू सूदने लोकांना देवदूत म्हणून मदत करत आहे. आज संपूर्ण देश त्याला खऱ्या नायकासारखा पाहत आहे. सोनू सूद लोकांना निःस्वार्थपणे मदत करत आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. इतकेच नव्हे तर लोकांच्या मूलभूत गरजा देखील तो पूर्ण करत आहे. हजारो गरजू लोक त्याच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधतात. 

तो प्रत्येकाला पुरेपूर मदत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही लोक त्याच्याकडे विचित्र मागणी देखील करताना दिसून येतात. असाच एक प्रकार सोमवारी (२३ ऑगस्ट) घडला. सोमवारी सोनू सुदने चाहत्यांच्या दोन ट्विटला प्रतिसाद दिला आहे. यातील एका चाहत्याने सोनूकडे तब्बल १ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर दुसऱ्याने त्याच्या पुढील चित्रपटात भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Actor Sonu Sood said that the strange demands made by the fans)

एका ट्विटर युजरने सोनूला टॅग करून लिहिले की, “सर मला १ कोटी रुपये द्या.” सोनूने या ट्वीटवर मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की, “फक्त १ कोटी? आणखी थोडे मागितले असते.”

दुसऱ्या ट्विटर युजरने विचारले, “सोनू सूद सर, तुम्ही मला तुमच्या पुढील चित्रपटात भूमिका द्याल का?” तर यावर सोनूने त्याला रिअल लाईफ हिरो होण्यास सांगितले आणि म्हणाला की, “एखाद्याला मदत करण्यापेक्षा कोणतीच मोठी भूमिका नाही. तिच भूमिका तू कर, तुमच्यापेक्षा मोठा कोणी नायक नाही.”

यापूर्वीही लोकं सोनूकडून विचित्र पद्धतीच्या मागण्या करत होते. काही लोकांनी तर सोनूकडे त्यांच्या मैत्रिणीसाठी आयफोन, मालदीवचा प्रवास, कार, इंटरनेटची चांगली गती आणि विवाहांची मागणी केली आहे.

गेल्या महिन्यात सोनूने त्याचा वाढदिवस साजरा केला. तेव्हा त्याच्या मुंबईतील घरी पुष्पगुच्छ, केक आणि भेटवस्तू घेऊन चाहत्यांची गर्दी झाली होती. सोनू सूदने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत ‘आशिक बनाया आपने’, ‘सिंग इज किंग’, ‘दबंग’, ‘हॅपी न्यू इयर’ आणि ‘सिम्बा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर त्याचा आगामी तेलुगु चित्रपट ‘आचार्य’ मध्ये तो दिसणार आहे. ज्यामध्ये चिरंजीवी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय तो अक्षय कुमार आणि मनुषी छिल्लरसोबत ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात देखील काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी

हे देखील वाचा