Saturday, July 26, 2025
Home बॉलीवूड माणुसकीचे दुसरे नाव म्हणजे सोनू सूद! अपघातग्रस्ताला मदत करत पुन्हा एकदा समाजासमोर ठेवले उत्तम उदाहरण

माणुसकीचे दुसरे नाव म्हणजे सोनू सूद! अपघातग्रस्ताला मदत करत पुन्हा एकदा समाजासमोर ठेवले उत्तम उदाहरण

सोनू सूद (Sonu Sood) बॉलिवूडमधील प्रभावी अभिनेता असण्यासोबतच आता एक देवदूत म्हणून देखील ओळखला जातो. कोरोना महामारीच्या काळात सोनुने गरजू लोकांना जी काही मदत केली ती खरंच वाखाणण्याजोगी होती. आता देखील सोनू प्रत्येक गरजू व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे मदत करताना दिसतो. सोनूला यामुळे एक वेगळी ओळख आणि नाव मिळाले आहे. चित्रपटातील हिरो देखील लाजवेल असे काम त्याने कोरोनाच्या काळात केले. खऱ्या अर्थाने तो हिरो ठरला आहे.

पुन्हा एकदा सोनूच्या मदतीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा सोनू कौतुकास पात्र ठरत आहे. असा म्हणतात की, जीवन देणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा अधिक मोठा असतो. असाच सोनू सूद पुन्हा एकदा मोठा मोठा ठरला असून, त्याने एकाच जीव वाचवत एक उत्तम उदाहरण लोकांसमोर तयार केले आहे. सोनू सध्या पंजाबमध्ये त्याची बहीण असलेल्या मालविका सूदचा प्रचार करत आहे. मालविका विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उभी असून सोनू तिचा प्रचार करून, पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील कोटकपुरा बायपास जवळून प्रवास करत होता.

गाडीतून जात असताना त्याला त्या रस्त्यावर दोन गाड्यांची टक्कर होत अपघात झाल्याचे दिसले. ते पाहून तो मदतीसाठी थांबला आणि त्याच्या लक्षात आले की, एका गाडीत एक व्यक्ती अडकला आहे. ते पाहून त्याने त्याच्या टीममधील लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले आणि त्याला उचलून तो पळत त्याच्या गाडीजवळ गेला आणि त्याला त्याच्या गाडीत स्वतःच्या मांडीवर डोके ठेऊन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेला. त्याच्यावर उपचार सुरु झाल्यानंतर देखील तो त्या व्यक्तीला शुद्ध येते तोपर्यंत हॉस्पिटलमध्येच थांबला होता. सोनूच्या या मदतीमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला. त्यानंतर सोनुने हॉस्पिटलला देखील त्याच्यावर नीट उपचार करण्यासाठी विनंती केली. यावेळी त्याच्यासोबत त्याची बहीण उमेदवार मालविका सूद देखील हजर होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी त्याचे भरभरून कौतुक करताना दिसत आहे. यासोबतच काहींनी तर त्याला माणुसकीचे दुसरे नाव सोनू सूद देखील म्हटले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा