Saturday, March 7, 2026
Home बॉलीवूड कोरोनाने तोडली अभिनेत्याची हिंमत! ‘माझे आई- वडील अगदी योग्य वेळी हे जग सोडून गेले’, म्हणत भावुक झाला सोनू सूद

कोरोनाने तोडली अभिनेत्याची हिंमत! ‘माझे आई- वडील अगदी योग्य वेळी हे जग सोडून गेले’, म्हणत भावुक झाला सोनू सूद

मागच्या वर्षीपासून संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनामुळे असंख्य लोकांचे आयुष्य खराब झाले आहे. अनेकांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावले आहे, तर लाखो लोकं या भयानक आजाराचा सामना करत आहे. या घातक संसर्गजन्य आजारामुळे जिथे जवळचे नातेवाईक देखील मदत करू शकत नाहीत, तिथे बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद मागील अनेक महिन्यांपासून रात्रंदिवस गरजूंच्या मदतीसाठी तत्पर उभा आहे.

नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यापासून ते रुग्णांना इंजेक्शन, बेड, ऑक्सिजन मिळवून देण्यापर्यंत प्रत्येक मदत सोनू करत आहे. याच संदर्भात झालेल्या एका मुलाखतीमध्ये सोनूने त्याच्या मनातील एक अशी बाब सांगितली आहे, जी ऐकून त्यावर काय व्यक्त व्हावे हे आपल्याला सुचणारच नाही.

एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी सोनूने सांगितले की, “आजची आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहता मला असे वाटते की, माझे आई- वडील अगदी योग्य वेळी हे जग सोडून गेले. आज जर ते असते आणि दुर्दैवाने त्यांना या व्हायरसची लागण झाली असती. त्यावेळी मला त्यांच्यासाठी बेड, ऑक्सिजन शोधावा लागला असता, तर मी आतून तुटून गेलो असतो.”

पुढे सोनू म्हणाला, “या महामारीच्या काळात मी असंख्य लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना गमावताना पाहिले. औषधं, बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठी झगडताना, रडताना पाहिले. त्यामुळे माझे आई- वडील आज नाहीत याचे मला समाधान वाटत आहे.”

लहानपणाची आठवण सांगताना सोनू म्हणाला, “मी लहान असताना आम्ही पंजाबमध्ये होतो तेव्हा, मी आणि माझे वडील आमच्या दुकानाजवळ गरीब आणि गरजू लोकांना मोफत जेवण द्यायचो, तर माझी आई गरीब मुलांना मोफत शिक्षण दयायची.”

खऱ्या आनंदाबद्दल बोलताना सोनू म्हणाला, “मी जेव्हा नागरिकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत करत होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि त्यांचे मिळणारे भरभरून आशीर्वादच माझ्यासाठी स्वर्गापेक्षा मोठा आणि खरा आनंद देणारे होते. आज या महामारीच्या काळात सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येउन देशाला या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी उभे राहिले पाहिजे.”

सोनूचे सर्व कार्य बघता त्याला नागरिकांनी देवाचा दर्जा दिला आहे. सोशल मीडियावर सोनूच्या पोस्टर्सला होणाऱ्या दुधाच्या अभिषेकाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. सोनू लवकरच आंध्रप्रदेशमध्ये ऑक्सिजन प्लांट लावणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करोडपती सुपरस्टार शाहिद कपूरच्या सावत्र वडिलांवर आली वाईट वेळ, खुद्द आईनेच केलाय खुलासा

-अमिताभ बच्चन यांनी जेव्हा पहिल्यांदा केला होता आमिर खानला फोन; उत्तर देताना म्हणायचा फक्त ‘हे’ दोन शब्द

-जेव्हा क्रिकेटवर विनोद करणे अनुष्का शर्माला पडले होते महागात; करण जोहरने ‘या’ शब्दात उडवली होती तिची टिंगल

हे देखील वाचा