मागील दोन वर्षांपासून संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक लहान मुले अनाथ झाले. तर काहींचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. अशा बिकट काळात गरजू आणि गरीब लोकांना मदतीचा हात पुढे केला तो अभिनेता सोनू सूदने. कोरोना काळात सोनुने फक्त आरोग्याशी संबंधितच लोकांना मदत केली असे नाही. त्याने अनेकांना नोकरी मिळवून दिली, व्यवसाय सुरु करून दिला. काही लोकांना आर्थिक मदत देखील केली. सोनू सूद मागील काही महिन्यांपासून सतत लोकांच्या मदतीसाठी तत्पर दिसत आहे. सोनुने जे काही काम केले आहे त्याची दखल देशात तर घेतली जातच आहे, सोबत परदेशातही त्याचे कौतुक होताना दिसत आहे. नेहमीच सोनूच्या मदतीचे एक वेगळे रूप लोकांना पाहायला मिळते.
कोरोनाकाळात मुंबईमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यापासून ते लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड, औषधं आणि ऑक्सिजन देण्यापर्यंत सोनूने प्रचंड मदत केली. आता सोनू चक्क इडली वडा विकताना दिसत आहे. सोनुने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात सोनू एका इडली वडा विकणाऱ्या माणसाला त्याचाच इडली वडा खाऊ घालताना दिसत आहे. यात सोनू भोपू देखील वाजवत आहे.
जहरुद्दीन नावाच्या या व्यक्तीसोबत बोलताना सोनू म्हणतो, “रोज तुम्ही लोकांना इडली वडा खाऊ घालता आज मी तुम्हाला इडली वडा खाऊ घालतो. आज तुम्ही व्हीआयपी आहात’ असे म्हणत त्याने त्या व्यक्तीचे हात देखील धुतले. शिवाय त्याच्याच प्लेट्मधून सोनुने इडली देखील खाल्ली. या व्हिडिओच्या माध्यमातून सोनुने अशा गरीब आणि लहान विक्रेत्यांना मदत करण्याचे आणि त्यांच्याकडून खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.
सोनूचा हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरत असून, त्यावर लोकांनी देखील सकारत्मक प्रतिसाद दिला आहे. सोबतच सोनूच्या मोठ्या मनाचे आणि त्याच्या या मदतीचे कौतुक देखील केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा










