Wednesday, February 4, 2026
Home अन्य ‘या’ अभिनेत्रींचे तिसरे लग्नही मोडण्याच्या मार्गावर?, पतीने केले गंभीर आरोप

‘या’ अभिनेत्रींचे तिसरे लग्नही मोडण्याच्या मार्गावर?, पतीने केले गंभीर आरोप

चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे आयुष्य आपल्याला पडद्यावर खूप सुंदर आणि आरामदायी वाटते. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांना सामान्य व्यक्तीप्रमाणे अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा कलाकार त्यांच्या कारकिर्दीपेक्षा जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनत असतात. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी देखील तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असते. माध्यमांतील वृत्तानुसार, श्राबंती चॅटर्जी तिचे लग्न मोडणार आहे.

श्राबंती चॅटर्जीचे हे तिसरे लग्न होते. जे आता ती घटस्फोट घेऊन मोडणार आहे. तिने पती रोशन सिंगकडून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. पण श्राबंती चॅटर्जी कोण आहे आणि तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात कुठून केली हे जाणून घेऊया. ३४ वर्षांच्या श्राबंती चॅटर्जीने १९९७ मध्ये बंगाली चित्रपट ‘मयार बँडन’ द्वारे चित्रपटांत पदार्पण केले. तिच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘लॉकडाउन’ चित्रपटात दिसली होती.

अभिनेत्री श्राबंती चॅटर्जीने आतापर्यंत तीन वेळा लग्न केले आहे. २००३ मध्ये तिचे पहिले लग्न चित्रपट निर्माते राजीव कुमार बिस्वास यांच्याशी झाले. पण २०१६ मध्ये तिने राजीवपासून घटस्फोट घेतला. यानंतर श्राबंतीने २०१६ मध्ये मॉडेल कृष्णा वराजशी लग्न केले. हे लग्न फक्त १ वर्ष टिकले आणि २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर १९ एप्रिल २०१९ रोजी तिने रोशन सिंगशी लग्न केले.

श्राबंतीचा पती रोशन सिंगने माध्यमांशी बोलताना दावा केला आहे की, तो अभिनेत्रीच्या अनेक मित्रांच्या सतत संपर्कात आहेत. त्याला समजले आहे की, श्राबंती सर्व लोकांशी गैरवर्तन करते आणि रोशन सिंग खूप लठ्ठ असल्याचे सांगते. रोशनच्या मते, श्राबंती तिच्या मित्रांना सांगते की, तिचा पती लठ्ठपणामुळे तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेऊ शकत नाही. अशा गोष्टींमुळे त्याची बदनामी होते.

रोशन म्हणाला की, इतकेच नाही, तर श्रबांती चॅटर्जी तिच्या मित्रांना रोशनबद्दल सांगते की, त्याने तिच्याकडून १ कोटी रुपये घेतले आहेत. रोशनने असेही सांगितले आहे की, तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला फोन करतो आणि तिच्याबद्दल तक्रार करतो. दोघांचे नाते टिकेल की नाही या प्रश्नाचे उत्तर काळानुसार समजेल. पण रोशन सिंगने सांगितले आहे की, त्याला अद्याप घटस्फोटाची नोटीस मिळाली नाही.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक

बॉलिवूडमधील ‘या’ चित्रपटांमध्ये जेठालाल यांनी साकारल्या होत्या लहान-मोठ्या भूमिका, आज आहे टेलिव्हिजनवरील सुपरस्टार

‘या’ सुपरहिट चित्रपटांसाठी ‘या अभिनेत्री होत्या पहिली पसंती, कोणी प्रेग्नन्सीमुळे तर कोणी ब्रेकअपमुळे सोडले सिनेमे

हे देखील वाचा