दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक, आणि अभिनेते श्रीनिवासन (Sreenivasan) यांची प्रकृती अनेक दिवसांपासून चिंताजनक असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंता वाढली होती. श्रीनिवासन यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
श्रीनिवासन हे मल्याळम सिनेसृष्टीतील आघाडीचे पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहलेले अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत असतात. अलिकडेच त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर बायपास सर्जरीही करण्यात आली होती. यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत होते. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट समोर आली असून, त्यांच्या प्रकृतीबद्दल सुधारणा होत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
दरम्यान अभिनेते श्रीनिवासन यांनी ‘ट्राफिक’, ‘मनी बॅंक पॉलिसी’, ‘नाजान’सारखे अनेक गाजलेले चित्रपट तयार केले आहेत. त्यांनी तब्बल २५० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या चित्रपटांचे आजही चर्चा होत असते. त्यांच्या या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांना अनेक राष्ट्रिय पुरस्कार मिळवले आहेत. अभिनेते श्रीनिवासन यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी झाला होता. लहानपणापासूनच चित्रपट जगताची आणि लेखनाची आवड असलेल्या श्रीनिवासन यांनी याच क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना विमील आणि ध्यान अशी दोन मुले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-