Monday, July 15, 2024

दिग्गज मल्याळम अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, वेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याने चाहते चिंतेत

भारतीय चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेते श्रीनिवासन (Sreenivasan) सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. ३१ मार्चला त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांची तातडीची बायपास सर्जरी करण्यात आली होती. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी बातमी समोर आली असून त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना काळजी लागली आहे. श्रीनिवासन यांना ३० मार्चला हा ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन यांनी आपल्या ६६व्या वाढदिवसादिवशी सर्जरी केली होती. आता त्यांचे चाहते त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. 

श्रीनिवासन हे मल्याळम चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात. अभिनयाइतकेच ते लोकप्रिय कथा लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी समाधानम, गांधीनगर, २ स्ट्रीट अशा गाजलेल्या चित्रपटांच्या कथा लिहल्या आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट जगतावर ९० च्या दशकात चांगलेच वर्चस्व  गाजवले होते. एक लेखक आणि अभिनेता म्हणूनही त्यांनी जोरदार लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या या चित्रपटांचे असंख्य चाहते आज पाहायला मिळत आहेत.

अभिनेते श्रीनिवासन यांनी १९८९ मध्ये वडक्कुनोक्कियंत्रम चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे.  आणि चिंताविष्टय्या श्यामला, इतर सामाजिक समस्यांसह, २९व्या केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार देखील जिंकला. सध्या त्यांच्या प्रकृतीबद्दल त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.  अभिनेते श्रीनिवासन यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ ला झाला होता. आपल्या दमदार अभिनयासाठी त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. त्यांना विनीत आणि ध्यान अशी दोन मुले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा