‘कट्यार काळजात घुसली’, ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’, ‘बालगंधर्व’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम करून नावारूपाला आलेला आघाडीचा आणि धडाडीचा अभिनेता, निर्माता आणि लेखक म्हणजे सुबोध भावे होय. सुबोध भावेने चित्रपटसृष्टीत अनेक भूमिका निभावून रसिकांच्या मनात त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर तो अनेकवेळा त्याचे फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांशी जोडून असतो. अशातच त्याने त्याचा एक फोटो शेअर करून एक भन्नाट कॅप्शन दिले आहे.
सुबोधने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत डिझेल आणि पेट्रोलचे पंप दिसत आहेत. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “सतत असं वाटायचं की, या सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे. त्यांना त्यांच्या किमतीमुळे आपण लयच भारी आहोत असं वाटायला लागलं होतं. दरवर्षी सण आला की, त्यांचा भाव वाढायचा, पण आता नाही. कारण आता डिझेल आणि पेट्रोलने सोन्या-चांदीची मस्ती उतरवली आहे. आता दागिने पण यांचेच करणार, बँकेत ठेव म्हणून पण यांनाच ठेवणार स्वतः बरोबर आख्खा बाजारभाव यांचं कर्तुत्व अफाट आहे. हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.” (Actor subodh bhave share his photo on social media with telling increasing value of diesel and petrol)
त्याने एक गंभीर विषय अगदी हलक्या फुलक्या अंदाजात मांडल्यामुळे त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. तसेच हे दागिने खूप अनमोल आहेत असे सांगत आहेत. त्याने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CU1qUeat9AN/?utm_medium=copy_link
सुबोध भावेच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, त्याने अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘फुगे’, ‘पुष्पक विमान’, ‘विजेता’, ‘भयभीत’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने ‘तुला पाहते रे’, ‘का रे दुरावा’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-केशरी रंगाचे महत्व सांगत नवरात्रीच्या चौथ्या दिवशी अपूर्वा नेमळेकरचा जगदंबा अवतार
–अमिताभ यांच्यासोबत असणाऱ्या अफेयरच्या प्रश्नावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या होत्या…
–आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद