Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

आनंदाची बातमी! सुबोध भावे ‘या’ चित्रपटातून पहिल्यांदाच झळकणार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

अभिनेता सुबोध भावे हा अष्टपैलू कलाकार आहे. त्याने स्त्रीसोबतच अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अर्थात त्याची प्रत्येक भूमिका केवळ प्रेक्षकांना आवडली नाही, तर प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम करून त्याने रसिकांचे मनोरंजन केले आहे आणि अजूनही करत आहेत. भारदस्त व्यक्तिमत्व, उत्तम संवाद कौशल्यामुळे सुबोधची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. अशातच त्याच्याबाबत एक मोठी बातमी समोर आहे की, सुबोध लवकरच शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुबोध भावे हा लवकरच मोठ्या पडद्यावर शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा ‘पावनखिंड’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाणार आहे. याच चित्रपटात सुबोध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. (Actor subodh bhave will first time play role of shivaji maharaj in his upcoming movie)

सुबोधने याआधी अनेक वेगवेगळी पात्र निभावली आहे. परंतु शिवाजी महाराजांचे पात्र पहिल्यांदाच त्याच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे त्याच्यासोबत सगळे प्रेक्षक देखील त्याला शिवाजी महाराजांच्या वेशात आणि भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक आहेत.

सुबोध भावेच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, त्याने अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘फुगे’, ‘पुष्पक विमान’, ‘विजेता’, ‘भयभीत’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘तुला पाहते रे’, ‘का रे दुरावा’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवरात्री २०२१: ‘मोहे रंग दो लाल’, म्हणत सुखदाकडून दिलखेचक फोटो शेअर, तर पती अभिजितची कमेंट ठरतेय लक्षवेधी

-तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं स्पृहाचं सौंदर्य, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

-‘सौंदर्यासाठी लहान कपड्यांची गरज नाही…’, मराठमोळ्या मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

हे देखील वाचा