Friday, July 5, 2024

बॉलिवूडचा अण्णा संतापला, भर कार्यक्रमात म्हणाला, ‘इथं सगळेच नशेडी नाहीत, माझे ३०० मित्र आहेत…’

मागील काही वर्षांपासून बॉलिवूड चाहते जरा जास्तच नाराज आहेत. विशेषत: जेव्हापासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर अं’मली पदार्थांचा विषय समोर आला आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर सातत्याने बॉयकॉट बॉलिवूड यांसारखे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. अशात अभिनेता सुनील शेट्टी याने याप्रकरणावर आपले मत मांडले आहे. तो म्हणाला आहे की, बॉलिवूडमध्ये सर्वजण व्यसनी नाहीयेत. तसेच, काही स्टारकिड्सची नावे यात आल्यानंतर तो म्हणाला की, त्यांना चुकांसाठी माफ केले पाहिजे.

झाले असे की, सुनील शेट्टी (Suniel Shetty) मंगळवारी (दि. २८ जून) ‘अं’मली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस’ या दिवसानिमित्त एका कार्यक्रमात सामील झाला होता. यादरम्यान त्याने अं’मली पदार्थ आणि बॉलिवूडवर आपले मत मांडले. यावेळी त्याला बॉलिवूड आणि अं’मली पदार्थांबाबतही प्रश्न विचारण्यात आले. त्याचे उत्तरही त्याने दिले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत सुनील शेट्टी म्हणत आहे की, “एक चूक चोराला डाकू बनवते… मी ३० वर्षांपासून या इंडस्ट्रीचा भाग आहे आणि माझे ३०० मित्र आहेत, ज्यांनी आयुष्यात काहीही केले नाही.” अं’मली पदार्थ प्रकरणामुळे किती सेलिब्रिटी आणि स्टार किड्स प्रसिद्धीच्या झोतात आले हेही त्यांनी सांगितले. तो म्हणाला की, “बॉलिवूडमध्ये सगळेच व्यसनी नाहीत. जे दाखवले जात आहे, खरं तर ते तसे नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यादरम्यान सुनील शेट्टी याने म्हटले की, “चूक कोणाकडूनही होऊ शकते. त्यांना लहान मुलगा समजून माफ केले पाहिजे. बॉलिवूड, बॉलिवूड ड्र’ग्ज असे हॅशटॅग सोशल मीडियावर चालवू नयेत, हे चुकीचे आहे. इंडस्ट्री व्यसनींनी भरलेली नाही, इथे सगळेच व्यसनी नाहीत.”

सुनील शेट्टी याच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा २०२२मध्ये आलेल्या ‘घनी’ या सिनेमात झळकला होता. त्याने त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत शंभरहून अधिक सिनेमात काम केले आहे. त्याने या सिनेमांमध्ये फक्त एकच एक भूमिका साकारली नाही, तर त्याने कॉमेडी आणि खलनायकाच्याही भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा