Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

सनीला झालंय तरी काय? जॅकी, मिथुन दा अन् संजूला एकत्र पाहून म्हणाला, ‘मैं ढाई किलो का हाथ…’

सिनेमाच्या पडद्यावर नायक हा त्याच्या दमदार अभिनयाने खलनायकांना चारीमुंड्या चीत करतो. असाच एक बॉलिवूडमधील दमदार अभिनेता म्हणजे सनी देओल होय. सनी देओल त्याच्या ऍक्शन सिनेमांसाठी ओळखला जातो. चाहत्यांना सनी देओल म्हटलं की, फक्त त्याचा ‘ढाई किलो का हाथ’ हा डायलॉग आठवल्याशिवाय राहत नाही. मात्र, तो सिनेमाच्या पडद्यावर जरी कठोर दिसत असला, तरी त्याचा स्वभाव खूपच मजेशीर आहे. तसेच, तो त्याच्या विनोदबुद्धीसाठीही ओळखला जातो. अशातच त्याचे एक ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याची विनोदबुद्धी यातून दिसून येते.

काय आहे सनी देओलचे ट्वीट?
झालं असं की, जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) हेदेखील दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, “जिथे चार मित्र एकत्र येतील. अरे चौथा कुठंय भिडू.” या पोस्टमध्ये त्यांनी संजय दत्त आणि मिथुन दा यांनाही टॅग केले आहे.

हे ट्वीट रिट्विट करत सनी देओल (Sunny Deol) याने लिहिले की, “तुम्ही खूपच फिट दिसत आहात. मी पण माझा अडीच किलोचा हात घेऊन येत आहे.” सनीच्या या रिऍक्शनने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. दुसरीकडे, संजय दत्त याने इंस्टाग्रामवर फोटो रिपोस्ट करत “शूटचा पहिला दिवस आणि सनीने बंक केला. पाजी कुठे आहात?”

जॅकी, सनी आणि संजय यांनी ही पोस्ट अशीच केलेली नाहीये. खरं तर, चित्रपटसृष्टीतील हे चार दिग्गज आता एका सिनेमात एकत्र येणार आहेत. जॅकीची ही पोस्ट या सिनेमाची अधिकृत घोषणा आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा सिनेमा विवेक चौहान दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमाचे शीर्षक ‘बाप’ आहे. या सिनेमाची निर्मिती अहमद खान आणि झी स्टुडिओ करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, हे सर्व कलाकार वयाच्या या टप्प्यावरही सिनेमात खूप व्यस्त आहेत.

विशेष म्हणजे, मिथुन दांचा शेवटचा सिनेमा ‘द काश्मीर फाईल्स’ होता, जो २५० कोटी क्लबमध्ये पोहोचणारा या वर्षातील एकमेव सिनेमा आहे. त्याचवेळी, जॅकी श्रॉफ आता ‘ओम’ सिनेमामध्ये दिसणार आहेत, जो जुलैमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. संजय दत्त ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये अक्षय कुमारसोबत दिसला होता आणि आता ‘शमशेरा’मध्ये रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. या सर्व सिनेमांसाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

हे देखील वाचा