Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी

छोट्या पडद्यावर अनेक अभिनेत्रींनी उत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा मिळवली आहे. यात सूनेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विशेष प्रसिद्धीच्या झोतात असतात. अशीच टीव्हीवरील प्रसिद्ध सून म्हणजे सुरभी चंदना होय. सुरभीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. शनिवारी (११ सप्टेंबर) ती आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या या वाढदिवशी आपण तिच्या संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

सुरभीचा जन्म ११ सप्टेंबर, १९८९ रोजी मुंबईत झाला होता. तिने आतापर्यंत अनेक हिट टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रसिद्ध ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधून केली. यानंतर तिने स्टार प्लसचा शो ‘एक ननद खुशियों की चाबी… मेरी भाभी’मध्ये काम केले. सुरभीला ‘कुबूल है’ मधील हयाच्या भूमिकेसाठी चांगलीच पसंती मिळाली. मात्र, तिला स्टार प्लसचा शो ‘इश्कबाज’मधून खरी ओळख मिळाली.

सुरभी कोट्यवधींची आहे मालकी
तिने या शोमध्ये अनिका ओबेरॉयची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमात तिची कामगिरी पाहून तिला इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार, एशियन व्ह्यूअर्स टेलिव्हिजन पुरस्कार आणि सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुरभी टीव्ही शो ‘संजीवनी’च्या नवीन पर्वामध्ये डॉ. ईशानी अरोराचे पात्र साकारताना दिसली. मात्र, या मालिकेला फारसे यश मिळाले नाही. सुरभी टीव्हीवरील ‘नागिन’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. सुरभी या मालिकांमधून भरपूर कमावते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सुरभी चंदन सुमारे १ मिलियन डॉलर्सची मालकीण आहे. सुरभी ‘इश्कबाज’ शोच्या एका भागासाठी सुमारे ६९,००० रुपये इतकी रक्कम घेत होती. याशिवाय ती एका वर्षात सुमारे १ कोटी रुपये कमावते. सीरियल्स व्यतिरिक्त, सुरभी पेड प्रमोशन आणि ब्रँड एंडोर्समेंटद्वारे देखील प्रचंड पैसे कमावते.

आलिशान गाड्यांची आवड
सुरभीला गाड्यांची खूप आवड आहे. तिच्याकडे बीएमडब्ल्यू कार आहे. तिला या कारमध्ये प्रवास करायला खूप आवडतो. याशिवाय तिला तिच्या कपड्यांवर आणि दागिन्यांवर पैसे खर्च करायलाही आवडते. सुरभी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि अनेकदा ती तिचे सुंदर फोटो शेअर करते. तिच्या फोटोंना चाहते देखील प्रचंड पसंती देतात.

अनिका उर्फ ​​सुरभी पडद्यावर सर्व प्रकारच्या ग्लॅमरस आणि सुसंस्कृत पात्रांची भूमिका साकारत असते. परंतु खऱ्या आयुष्यात ती खूप बोल्ड अभिनेत्री आहे. ती अनेकदा तिच्या बिकिनी आणि बीचवरील फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरत असते. सुरभी हे टीव्हीचे सुप्रसिद्ध नाव आहे आणि सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे.

सुरभीने तिच्या महाविद्यालयीन काळात प्रिन्सेस कॉन्टेस्टमध्येही भाग घेतला होता. टीव्ही अभिनेत्री होण्यापूर्वी तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले. टीव्ही शोमध्ये मिळालेल्या यशानंतर सुरभीला २०२० मध्ये आशिया टीव्ही पर्सनॅलिटीमध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता. ईस्टर्न आय न्यूजपेपर टॉप ५०च्या आशियाई सेलिब्रिटींच्या यादीत तिला नवव्या क्रमांकावर स्थान देखील मिळाले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नादच खुळा! अल्लू अर्जुनपासून ते सूर्यापर्यंत १०० कोटींच्या क्लबचे बादशाह आहेत ‘हे’ साऊथ सुपरस्टार्स

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

-बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून

हे देखील वाचा