बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगद्वारे आपल्या भावना व्यक्त करत राहतात. ते ब्लॉगद्वारे नवीन खुलासे करतात आणि वाचकांशी सतत संवाद साधतात. आता त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एक चित्रपट पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले की, या चित्रपटाचे गाणे पाहून ते इतके भावुक झाले की, त्यांना त्यांच्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी लिहिले, “या चित्रपटातील ‘क्लायमॅक्स’ गाणे पाहून मी इतका भावुक झालो की, माझे अश्रू रोखणे मला कठीण झाले.”
कोणाच्या चित्रपटाचे गाणे पाहून ‘बिग बी’ भावुक झाले?
बॉलिवूडचे शेहंशाह ‘बिग बी’ दक्षिण भारतीय सुपरस्टार सूर्या शिवकुमार यांच्या एका चित्रपटाचे गाणे पाहून भावुक झाले. त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे हे व्यक्त केले आणि संपूर्ण घटनेचा उल्लेख केला.
सूर्य शिवकुमारचा मोठा चाहता वर्ग आहे. डब वर्जनमध्ये त्याचे चित्रपट उत्तर भारतातही खूप पसंत केले जातात. हिंदी प्रेक्षक देखील त्याचे साऊथचे चित्रपटही खूप पाहतात आणि हिंदीमध्येही त्याचे खूप चाहते आहेत. त्याच्या दमदार अभिनयानने सूर्या बराच काळ आपले स्टारडम टिकवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. त्याचा ‘सोरारई पोट्टरू’ नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. जो प्रेक्षकांनाही खूप आवडला. अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाच्या गाण्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हा चित्रपट पाहून ‘बिग बीं’ना अश्रू अनावर झाले
सूर्याचा चित्रपट पाहून अमिताभ बच्चन अक्षरश: रडले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ज्याचा त्यांनी ब्लॉगमध्ये उल्लेख केला आहे. आपल्या ब्लॉगमध्ये चित्रपटाचा संदर्भ देत त्यांनी लिहिले आहे की, चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या एका गाण्याने त्यांना खूप भावूक केले. या गाण्याच्या दरम्यान त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
त्यांनी लिहिले, “वेळ आहे, वेळ आहे आणि वेळ आहे, जे कधीकधी अविश्वसनीय क्षण आणते. असेच काही काल रात्री घडले आणि भावना इतक्या जड होत्या की, माझे अश्रू रोखणे खूप कठीण होते आणि अश्रू वाहू लागले.” त्यांनी लिहिले की, “या क्षणांचे वर्णन केले जाऊ शकत नाही, परंतु मी त्याबद्दल सांगतो.” अमिताभ यांनी लिहिले की, एक गाणे, सूर्याच्या चित्रपटातील तामिळ गाणे. सूर्या साउथचा सुपरस्टार व्हिडिओमध्ये बघता येईल हा क्षण हृदयद्रावक आहे. मुलगा आणि वडील यांच्यातील भावनांची ही कथा आहे.” अमिताभ यांनी या गाण्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे आणि तमिळ गाण्याचा काही भागही भाषांतर केला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा










