Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडमध्ये गंभीर पात्र साकारत अभिनेता सुशांतने प्रेक्षकांच्या मनावर पाडली अभिनयाची छाप

बॉलिवूडमध्ये गंभीर पात्र साकारत अभिनेता सुशांतने प्रेक्षकांच्या मनावर पाडली अभिनयाची छाप

बॉलिवूडमध्ये 90च्या दशकात पाऊल ठेवणारे अभिनेता सुशांत सिंग यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत नाव कमावलेल्या सुशांत सिंग यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांचा जन्म 9 मार्च, 1972 मध्ये झाला होता. हिंदी सिनेमा ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत सुशांत सिंग यांनी त्यांच्या टॅलेंटने सर्वांना भारावून सोडले आहे. इतकेच नव्हे तर सुशांत यांनी वेब सीरिजमध्येही धमाकेदार एंट्री घेतली आहे.

सुशांत यांनी अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘सत्या’ या गुन्हेगारी ड्रामामधून केली होती. ‘कौन’ चित्रपटात सुशांत यांनी मनोरुग्णाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत उर्मिला मातोंडकरही दिसली होती. यानंतर, सुशांतने ‘जंगल’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती, यातून त्यांना चित्रपटसृष्टीत खरी ओळख मिळाली. सुशांत यांनी त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत अशी काही पात्रे साकारली आहेत, ज्याला टक्करच नाही. जाणून घेऊया त्या पात्रांबद्दल…

मातृभूमी
‘मातृभूमी’ हा चित्रपट 2003 मध्ये आला होता. या चित्रपटात सुशांत यांनी अशा मुलाची भूमिका केली होती, ज्याचे लग्न अशा मुलीशी होते जिचे त्याच्या बाकीच्या भावांशीही लग्न झालेले असते. या चित्रपटातील सुशांत यांची व्यक्तिरेखा विसरणे अशक्य आहे.

सेहर
सन 2005 च्या ‘सेहर’ या गुन्हेगारी ड्रामा चित्रपटात सुशांत यांनी एका गुन्हेगाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर सुशांत यांना बरीच प्रसिद्धी मिळाली.

रक्तचरित्र
‘सहर’नंतर सुशांत सिंगला राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या गँगस्टर चित्रपट ‘रक्तचरित्र’मध्ये कास्ट केले. चित्रपटात विवेक ओबेरॉयच्या भूमिकेत सुशांत यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटानंतर सुशांत यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

रंगबाज
चित्रपटांमध्ये टॅलेंट दाखविल्यानंतर सुशांतने वेब सीरिजमध्ये पदार्पण केले आणि ते ‘रंगबाज’मध्ये दिसले. या व्यतिरिक्त, 26 जानेवारी रोजी वेबसीरीज ‘जीत की ज़िद’मध्ये सुशांत यांनी एका दमदार अधिकाऱ्याची भूमिका साकारली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्रीदेवीशी केले गुप्तपणे लग्न, एकेकाळी होता नक्षलवादाशी संबंध; वाचा मिथुन चक्रवर्तींचे न ऐकलेले किस्से

-‘कल्लू मामा’ची भूमिका साकारून गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य; वाचा सौरभ शुक्ला यांचा जीवनप्रवास

-विरुष्काच्या पहिल्या भेटीचा ‘तो’ किस्सा होता विराटला अस्वस्थ करणारा; वाचा काय घडले होते त्यावेळी?

हे देखील वाचा