मृत्यूनंतर पहिल्यांदाच सुशांत सिंगचा ‘हा’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर, बॉक्स ऑफिसवर करणार धमाल


भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांनी चीनच्या बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवला आहे. तिथल्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांनी भरपूर कमाई केली आहे. ज्यात नितेश तिवारीचा २०१६ मधील आमिर खान (Aamir Khan) अभिनित चित्रपट ‘दंगल’ (Dangal) हा सर्वात मोठा पुरावा आहे, ज्याने तिथे जवळपास २००० कोटींची बंपर कमाई केली होती.

कोरोना महामारीनंतर बॉलिवूडचा कोणताही चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाला नाही. नितेश तिवारी २०२०मध्ये चीनमध्ये ‘छिछोरे’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत होते. परंतु कोरोनामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड चीनच्या बॉक्स ऑफिसवर दणकेबाज कामगिरी करायला सज्ज झाले आहे. या सर्वात पहिल्यांदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’चा हा चित्रपट सज्ज झाला आहे.

‘छिछोरे’ २०२२ मध्ये होणार प्रदर्शित
माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘छिछोरे’ आता चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुशांत, श्रद्धा कपूरसह चित्रपटातील अनेक कलाकार आता चीनच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. हा चित्रपट २०१९ मध्ये भारतात प्रदर्शित झाल्यानंतर २०२० मध्ये चीनमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनाने निर्मात्यांना निर्णय बदलण्यास भाग पाडले. आता ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा सुशांतचा ‘छिछोरे’ हा चित्रपट चीनमध्ये पाहिला जात आहे. प्रेक्षक जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या पडद्यावर पाहू शकतील.

भारतात मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
सुशांतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १५३.०९ कोटींची कमाई केली. या चित्रपटाला केवळ प्रेक्षकांकडूनच नव्हे, तर समीक्षकांकडूनही खूप प्रेम मिळाले आहे आणि आता निर्मातेही ‘छिछोरे’बद्दल खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

‘दंगल’ने चीनच्या बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकूळ
चीनमध्ये भारतीय चित्रपटांचा चांगला प्रेक्षकवर्ग आहे. तिथल्या प्रेक्षकांना बॉलिवूड चित्रपट खूप आवडतात. नितेश तिवारीच्या शेवटचा प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’बद्दल बोलायचे झाले, तर त्या चित्रपटाने जवळपास १००० कोटींचा व्यवसाय करून सर्व रेकॉर्ड तोडले होते, तर भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास ३५० कोटींचा टप्पा ओलांडला होता. अशा परिस्थितीत आता ‘छिछोरे’कडूनही सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत की, हा चित्रपट चीनच्या बॉक्स ऑफिसवरही यशाचा झेंडा रोवेल आणि ही केवळ चित्रपटासाठीच नव्हे, तर देशासाठी अभिमानाची बाब असेल. जेव्हा एखादा बॉलिवूड चित्रपट दुसर्‍या देशात एक विशेष यश मिळवेल.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!