Tuesday, April 7, 2026
Home मराठी ‘आता काय पानं विस्कटली’ अभिनेते सुशील इनामदार यांनी कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनावर व्यक्त केल्या भावना

‘आता काय पानं विस्कटली’ अभिनेते सुशील इनामदार यांनी कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनावर व्यक्त केल्या भावना

ज्येष्ट नाट्य समीक्षक, लेखक व दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे ११ मार्च रोजी दुःखद निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी कमलाकार नाडकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून ते आजारी होते. ५० वर्षे त्यांनी नाट्य समीक्षा लिहिली तर नाट्य समीक्षक म्हणून त्यांनी तब्बल पाच दशकं काम केले. यादरम्यान त्यांनी शेकडो नाटकांची समीक्षा लिहिली होती. रंगभूमीचा प्रत्यक्षानुभव, नाटकाची प्रचंड आवड आणि अभ्यासू वृत्ती यांच्या समन्वयातून त्यांच्यातला समीक्षक घडत गेला.

कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनाचे दुःख सर्वच मराठी मनोरंजनविश्वाला झाले खासकरून नाट्य सृष्टीला. अनेक लहान मोठ्या कलाकारांनी त्यांच्या निधनाचे दुःख व्यक्त केले, आता चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात काम करणाऱ्या अभिनेता सुशील इनामदारने देखील कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “अचानक एक क्षण सगळं स्तब्ध होतं. आजूबाजचं भान रहात नाही. अक्षरश: बहिरे होतो. तसंच काहीस झालं. Baba passed away हा नमिताचा मेसेज वाचून अगदीच तसं झालं. तुमच्या आयुष्याशी कोण कसं जोडलं जाईल हे काहीच सांगता येत नाही. कमलाकर काका असेच जोडले गेले. म्हणजे मला त्यांचा सहवास लाभला असं म्हणता येईल. एकतर नाट्य समिक्षेमधील एक मोठं नाव. प्रचंड वाचन . शार्प मेमरी. म्हणजे त्यांना कोणत्याही काळातील नाटकाबद्दल विचारा पाठांतर केल्यासारखं बोलणार.”

पुढे सुशील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “बरेच वर्ष अभिनय क्षेत्रापासून लांब राहिल्या वर जेव्हा पुन्हा नाटक सुरू केलं तेव्हा “द डेथ ॲाफ अ कॅान्करर्” या नाटकाच्या एका प्रयोगाला ते येणार असल्याच दिग्दर्शक सुनिल कदम सर बोल्ले. मी तर धसकाच घेतला. कारण त्यांची परिक्षणं सुरवातीला व्यावसायिक नाटकात काम केल्यामुळे वाचनात आली होती . एखादं नाटक नाही आवडलं तर झोडपून काढायचे. पण त्यांनी हिटलर डोक्यावर घेतला. खूप कौतुक केलं. आणि पुढल्या वर्षी मी अनुवाद केलेलं “हिरोशीमा” नाटक करा असा प्रेमळ सल्ला देखील दिला. आमच्या डिपार्टमेंटने केलं देखील. तेव्हा पुर्ण प्रोसेस मध्ये डॅा हेमू अधिकारी आणि कमलाकर काका यांनी मोलाची मदत केली. तेव्हापासून त्यांच्या संपर्कात आलो. वेळोवेळी मार्गदर्शन केलं.

माझी पहिला दैनंदिन मालिका “ गोठ “ त्यांच्यामुळेच मला मिळाली. एक दिवस त्यांचा अचानक फोन आला….मालिका करणार का ? माझी मुलगी नमिता वर्तक करतेय. तिने काही भागांच वाचन आत्ता घरी केलं तर मला तुम्ही डोळ्यांसमोर आलात. छान आहे भुमिका. करा. त्यांनी सांगीतल्यावर नाही म्हणायला जागाच नव्हती.

त्यांच आणि माझं शेवटचं संभाषण म्हणजे उद्ध्वस्त धर्मशाळा करतोय हे सांगण्यासाठी त्यांना फोन केला होता. कराकरा..अत्यंत महत्वाच नाटक…त्याचे संदर्भ बघणाऱ्याला आजही नक्की जाणवतील. शुभेच्छा तुम्हाला आणि टिमला. तब्येतीनं साथ दिली तर नक्की येईन प्रयोगाला. हे शेवटचं संभाषण. काका तुम्ही चालते बोलते नाटकाची डिक्शनरी होता. आता काय पानं विस्कटली. मात्र तुमचं ते सातमजली हासणं कायम लक्षात राहील…. कमलाकर नाडकर्णी….जयंत पवार यांच्या सारखे नाट्य समिक्षक जाणे हि नाट्य सृष्टीची मोठी हानी आहे”.

सध्या त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान सुशील यांनी अनेक मालिकांमध्ये काम करून ओळख मिळवली आहे. शिवाय रंगभूमीवर देखील ते मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शहनाज गिल असे काय म्हणाली की, दुसऱ्यांना हसवणाऱ्या कपिल शर्माला देखील हसणे झाले अनावर

‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा