नंदामुरी कुटुंबातील अभिनेता तारका रत्न याची तब्येत बिघडली आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वास्तविक, चित्तूरमध्ये एका रॅलीदरम्यान तारक रत्न अचानक बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांची तपासणी करण्यात आली. तारका रत्नचे काका आणि टॉलीवूड स्टार बालकृष्ण नंदामुरी यांनी उघड केले की, त्याच्यावर उपचार केले जात आहेत आणि त्याचे पॅरामीटर्स सामान्य आहेत. तारक रत्न ‘अमरावती’ आणि ‘9 आवर्स’ या वेब सिरीजमधील कामासाठी प्रसिद्ध आहेत.
आंध्र प्रदेशचे टीडीपी महासचिव एमएलसी नारा लोकेश यांच्या ‘युवा गालम’ पदयात्रेत सामील होण्यासाठी तारक रत्न ( taraka ratna)शुक्रवारी (दि. 27 जानेवारी)ला आला हाेता. यादरम्यान तो अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर अभिनेत्याला आंध्र प्रदेशातील कुप्पम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एसपी चित्तूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता तारका रत्न युवा गलम यात्रेत चालत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि ताे बेशुद्ध पडला, ज्यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आले.
बालकृष्ण नंदामुरी यांनी तारकरत्न यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्यांनी मीडिया संस्थेला सांगितले की, ‘तारकरत्नचे सर्व पॅरामीटर्स ठीक आहेत, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत आणि त्यांची काळजी घेतली जात आहे. काळजी करण्यासारखे काहीही नाही. त्याला बंगळुरूला नेण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याचे व्हॉल्व्ह ब्लॉक झाले होते.'(actor taraka ratna jr ntr brother suffers from a heart issue balakrishna nandamuri shares actor health update)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुखच्या पठाणचा जलवा! थेट राष्ट्रपती भावनातच चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग
भारतीय नारी राॅकींग इन साडी! श्रेया घोषालचा लेटेस्ट लूक एकदा पाहाच