टेलिव्हिजनवर अनेकवेळा पौराणिक कथांवर आधारित मालिका बनवल्या आहेत. पण आता याच पौराणिक कथेवर वेबसीरिज येणार आहे. सागर वर्ल्डचा शिव सागर लवकरच ‘वैष्णोदेवी’ वर आधारित एक वेबसीरिज बनवणार आहे. याच प्रोडक्शन हाऊसने ‘रामायण’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना दाखवली होती. प्रेक्षकांनी रामायणला खूप पसंती दर्शवली होती.
माध्यमातील वृत्तानुसार, सागर वर्ल्ड लवकरच 10-12 एपिसोडची वेबसीरिज बनवणार आहे. यात इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकार सामील असणार आहेत. या वेबसीरिजमध्ये लोकप्रिय अभिनेता तरुण खन्ना महादेवाची भूमिका निभावणार आहे. विशेष म्हणजे त्याने एक विक्रम केला आहे. तो आठव्यांदा महादेवाची भूमिका निभावत आहेत. (Actor Tarun khanna to become mahadev 8 th times in his upcoming webseries)
‘वैष्णोदेवी’ या कथेमध्ये रामायण या मालिकेतून यशाच्या शिखरावर पोहचलेली अभिनेत्री दीपिका चिखलिया मुख्य भूमिकेत असणार आहे. तिच्यासोबतच अभिनेत्री इशिता गांगुली आणि राणा यशोधन सिंगदेखील या वेबसीरिजमध्ये महत्वाची भूमिका निभावणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, हा शो खूप भव्यदिव्य पद्धतीने शूट केला आहे. ‘महाभारत’ फेम अभिनेते पुनित इस्सार यांचा मुलगा सिद्धार्थ इस्सार हा देखील या वेबसीरिजमधून डेब्यू करणार आहे.
तरुण खन्नाबाबत बोलायचे झाल्यास, महादेवाची भूमिका निभावणे हे त्यांना शंकराचे आशीर्वाद वाटतात. याआधी त्याने सात वेळा ही भूमिका निभावली आहे आणि आता ही आठवी वेळ आहे. या वेबसीरिजनंतर ‘शनी और परमवीर श्रीकृष्ण’ साठी देखील महादेवाची भूमिका निभावण्यासाठी निर्मात्यांनी त्यांना अप्रोच केले आहे. त्यांनी या आधी ‘नमह’, ‘राम सिया के लव कुश’, ‘देवी आदी पराशक्ती’ यांसारख्या मालिकांमध्ये महादेवाची भूमिका निभावली आहे.
This ultimate BLISS✨❤️#RadhaKrishn @Beatking_Sumedh #TarunKhanna
Hat's off to this scene @sktorigins @utkarshnaithani @writerswapnil @initinmgupta ???????? pic.twitter.com/Cwq0KpzEsa
— ???????????????????????? ???????????????????????????????? (@srinjabanerjee) August 15, 2019
या वेबसीरिजची शूटिंग गुजरामध्ये उमरगाव येथे होत आहे. अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कथांच्या शूटिंगसाठी निर्माते नेहमीच उमरगावला पसंती दर्शवतात. सध्या ‘राधा कृष्ण’, ‘अहिल्या बाई और मेरे साई’ यांसारख्या मोठ्या मालिका उमरगावमध्ये शूट होत आहेत.
‘वैष्णोदेवी’ आधारित वेबसीरिजबाबत बोलायचे झाल्यास या वेबसीरिजची शूटिंग पूर्ण झाल्यावर ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नादच खुळा! श्रीदेवीची लाडकी लेक बनलीय ‘लालपरी’, फोटोवर बहीण सोनमसह इतर मैत्रिणींच्या हटके कमेंट्स
–एका फोटोत केले चक्रासन, तर दुसऱ्यात पडलीय बेडवर; पाहा दीपिकाचे ‘एक्सपेक्टेशन वर्सेस रियॅलिटी’