Tuesday, July 9, 2024

अरे बापरे! चक्क उकळत्या तेलात हात घालून व्यक्तीने केले चिकन फ्राय, टायगर श्रॉफही झाला हैराण

बॉलिवूडचा ऍक्शन स्टार टायगर श्रॉफ सतत असे स्टंट करतो, जे पाहून चाहते आश्चर्यचकित होतात. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या फिटनेस व्हिडिओंसाठी चाहते त्याचे कौतुक करत असतात. नुकताच टायगर श्रॉफने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती उकळत्या तेलात हात बुडवून अन्न शिजवताना दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले. व्हिडिओमधील व्यक्ती उकळत्या तेलात हाताने अन्न शिजवताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. टायगर श्रॉफनेही या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

एका व्यक्तीला उकळत्या तेलात असे अन्न शिजवताना पाहून टायगर श्रॉफने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ शेअर करताना टायगर कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारताचा लोहपुरुष मजा केली! सिरीयसली, हा माणूस कोण आहे?” टायगरने शेअर केलेल्या या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ६ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

अली चिकन सेंटरमधून काढलेला व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “त्याचे हात जळत नाहीत? गरम उकळत्या तेलात हात घालून चिकन फ्राय करत आहेत.” हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफपर्यंत पोहोचला आणि त्याचे लक्ष त्याच्याकडे वेधले.

व्हिडिओमध्ये तो व्यक्ती एका बाजूला चिकन तळताना आणि नंतर हाताने तेलातून काढताना दिसत आहे. यानंतर, तो काढलेल्या चिकनला वेगवेगळे मसाले लावतो. जे नंतर दुकानात पोहोचलेल्या लोकांना दिले जाते.

मात्र, लोकांना आश्चर्याचा धक्का बसणारा हा पहिलाच व्हिडिओ नाही. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, जे पाहिल्यानंतर लोक गोंधळले आणि आश्चर्यचकित झाले. आता इंटरनेटवर स्वयंपाक करण्याची एक विचित्र पद्धत लोकांना आश्चर्यचकित करत आहे. चिकन तळताना या व्यक्तीचा हात कसा जळत नाही, असा विचार करून नेटिझन्स आश्चर्यचकित होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमार- पत्रलेखाच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ आला समोर; फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला, ‘माझ्याशी लग्न करशील?’

-पॅपराजीने पोझ द्यायला सांगताच भडकला रणबीर कपूर, रागाच्या भरात म्हणाला…

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यात पोहोचली हुमा कुरेशी, जोडपे आज अडकेल रेशीमगाठीत

हे देखील वाचा