बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच डान्समध्येही पटाईत असलेल्या अभिनेत्यांमध्ये टायगर श्रॉफ याचे नाव येते. टायगर हा प्रसिद्ध डान्सर, गायक असलेल्या मायकल जॅक्सन याच्यासारखा डान्स करण्यासाठीही ओळखला जातो. त्याचे डान्स स्टेप्स हे खूपच शानदार असतात. कदाचित त्याच्या स्टेप्सची नक्कल करणेही कुणासाठी सोपी गोष्ट नाहीये. मात्र, यावेळी टायगरने स्वत:च आपल्या डान्स स्टेप्सची थट्टा उडवली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शानदार स्टेप्स दाखवताना दिसला टायगर श्रॉफ
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याने त्याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत तो शानदार स्टेप्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत टायगरने सुंदर कॅप्शनही दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला वाटते की, या शॉटदरम्यान खरंच मला बाथरूमला जायचे होते.” त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचे तर सोडाच, कलाकारांनाही हसू फुटले. अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हिने कमेंटमध्ये हसण्याचे इमोजी वापरत प्रतिक्रिया दिली.
View this post on Instagram
त्याच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, यावर ४ लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. याव्यतिरिक्त व्हिडिओला ३ हजारांहून अधिक युजर्सने कमेंट्सद्वारे आपले प्रेम व्यक्त केले आहे. एका चाहत्याने लिहिले की, “तरीही तू खूप चांगल्याप्रकारे स्टेप्स केल्या.”
‘गणपत’ सिनेमाची शूटिंग संपली
खरं तर, टायगर श्रॉफ याने त्याच्या ‘गणपत’ या आगामी सिनेमाची शूटिंग संपवली आहे. हा सिनेमा येत्या २३ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यानंतर तो ‘रँबो’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तसेच, त्यानंतर तो अक्षय कुमार याच्यासोबत ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमात काम करताना दिसणार आहे.
शेवटचा ‘हिरोपंती २’मध्ये झळकलेला टायगर
अभिनेता टायगर श्रॉफ शेवटचा ‘हिरोपंती २’ या सिनेमात झळकला होता. हा सिनेमा एप्रिल महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मात्र, सिनेमाला बॉक्स ऑफिसवर खास कमाल करता आली नाही. यामुळे कलाकार दु:खातही होते. माध्यमांतील वृत्तानुसार, या सिनेमाची निर्मिती जवळपास ८५ कोटी रुपयांमध्ये केली होती. मात्र, सिनेमाला बजेटइतकीही कमाई करता आली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एका धाग्यावर टिकलाय उर्फीचा हॉट टॉप; जराशी केली गडबड, तर तिलाही होईल पश्चाताप
‘कब आयेगा मजा’ म्हणत सुमित राघवनने केले ‘आरे कारशेडवर’ विवादात्मक ट्विट