Wednesday, July 3, 2024

रॉयल लूकमध्ये दिसले बॉलिवूडचे ‘बाप-लेक’, व्हिडिओ शेअर करत टायगर म्हणाला, ‘वडिलांसोबत राहण्याचा…’

‘हीरोपंती २’ फेम प्रसिद्ध अभिनेता आणि युथ आयकॉन बनलेला बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात वेल ग्रूम्ड अभिनेता मानला जातो. टायगरच्या लुक्सचे असंख्य चाहते आहेत. मात्र, तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, या लुक्स आणि फॅशन स्टाइलसाठी टायगर कुणाला फॉलो करतो.

फिटनेस, फॅशन आणि ऍक्शनच्या बाबत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्याबाबत बोलायचं झालं, तर या सगळ्यामागे आहेत त्याचे वडील जॅकी श्रॉफ (Jackie Shroff).

टायगर श्रॉफ याने नुकतीच केलेली सोशल मीडिया पोस्ट बघितली, तर त्यात ही गोष्ट अगदीच स्पष्ट होते. स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग मंच कूवर टायगर श्रॉफने आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये एक व्हीडियो शेयर केलाय. यात तो आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये वडील जॅकी श्रॉफ यांच्यासह उभा आहे. दोघांनीही काळ्या रंगाचे जॅकेट्स घातले आहेत. दोघेही कमालीचे स्टायलिश दिसत आहेत. यासोबतच टायगरने या व्हिडिओसोबत मस्त गाणं जोडलं आहे. ते गाणं आहे, ‘डॅडी…. डॅडी कूल… डॅडी… डॅडी कूल…’

याआधी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीतही टायगर श्रॉफने याबाबत भाष्य केले होते. फॅशन आणि लुक्सचा प्रश्न येतो तेव्हा तो आपले वडील जॅकी श्रॉफ यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो. त्याला विचारले गेले की, फॅशनबाबत बॉलिवूडमध्ये कुणाला फॉलो करतो, तर त्याने वडिलांचे नाव घेतले. तो म्हणतो की, वडील जे काही घालतात, त्याची नक्कल मी अजिबातच करू शकत नाही, पण मी त्यांची बिंधास स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न नक्की करतो. कारण ते तर काहीही घालून त्यात कम्फर्टेबल दिसू शकतात.

कसे कपडे आवडतात टायगरला?
टायगर तरुणाईत कमालीचा लोकप्रिय आहे. कपड्यांबाबत बोलायचं तर, टायगरला नेहमीच आरामदायक वेशभूषा करणे आवडते.

टायगरचा या गोष्टींवर असतो कटाक्ष
रोज योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि नीट झोप घेणे हा टायगरच्या दैनंदिनीचा भाग आहे. यामुळे तो एकदम फ्रेश आणि छान दिसतो. टायगर आपल्या त्वचेची खास निगा राखतो. दिवसातून दोनदा डिटॉक्स करतो. टायगर आपले स्किन केयर प्रॉडक्ट्स नेहमीच प्रवास आणि शूटिंगच्या काळात सोबत ठेवतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) 

टायगर श्रॉफ लवकरच दिसू शकतो ‘वॉर’ सीक्वल मध्ये
टाइगर लवकरच वॉर सीक्वल (War Sequel) मध्ये ऋतिक रोशन (Hrithik Roshan) सोबत दिसू शकतो. याचा अंदाज टायगरच्या सोशल मीडिया पोस्टवरून घेता येतो. यात टायगरने दोन अर्ध्या चेहऱ्यांचा एक मोनोक्रोमॅटिक कोलाज शेअर केला होता. यात पहिला चेहरा खुद्द टायगरचा आहे आणि दुसरा ‘वॉर’ मध्ये सहकलाकार राहिलेल्या ऋतिक रोशनचा आहे.

ही पोस्ट शेअर करत, टायगरने एक पोल सुरू केला. यात त्याने चाहत्यांना एक प्रश्न विचारला, “वॉर पार्ट-२ कोई भी?” यासोबत हो किंवा नाही असे दोन पर्याय दिले गेलेत. यावर जवळपास ९६ टक्के चाहत्यांनी हो म्हणत आपले मत नोंदवले आहे. यातूनच स्पष्ट होते, की चाहते या अँक्शन सिनेमाचा सीक्वल पाहण्यास किती आतूर आहेत.

टायगरच्या आगामी सिनेमा बाबत बोलायचं तर टायगर गणपतच्या चित्रीकरणात सध्या बराच गुंतलेला आहे. हा सिनेमा येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टायगरसोबत क्रिती सेननची मुख्य भूमिका असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा