Monday, February 24, 2025
Home हॉलीवूड जबरदस्त! टॉम क्रूझने केला ट्रेन क्रॅशचा खतरनाक स्टंट; फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

जबरदस्त! टॉम क्रूझने केला ट्रेन क्रॅशचा खतरनाक स्टंट; फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

हॉलिवूडमध्ये असे अनेक शानदार अभिनेते आहेत, जे आपल्या अभिनयाने आणि स्टंटने चाहत्यांचे लक्ष वारंवार वेधून घेत असतात. असाच एक अभिनेता म्हणजे ‘मिशन: इम्पॉसिबल’ फेम टॉम क्रूझ होय. टॉम आपल्या ऍक्शनने नेहमीच नवनवीन विक्रम करून सर्वांना हैराण करत असतो. अशातच दिग्दर्शक ख्रिस्तोफर मॅकक्वेरी ‘मिशन: इम्पॉसिबल’च्या सातव्या आणि आठव्या सीरिजची सलग शूटिंग करत आहेत. यातील ७ व्या सीरिजमधील एक नवीन बीटीएस व्हिडिओ व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये व्हॅलीत तुटलेल्या ट्रॅकवर एक ट्रेन कोसळताना दिसत आहे.

टॉम क्रूझ आणि ‘मिशन: इम्पॉसिबल ७’ची टीम एका सीनची शूटिंग करत आहे, ज्यामध्ये खडकावर आदळून ट्रेन अपघातग्रस्त होते. हा शानदार ऍक्शन सीन नुकताच डर्बीशायरमध्ये शूट करण्यात आला आहे. ‘मिशन: इम्पॉसिबल ७’च्या लेटेस्ट स्टंट शूटिंगवेळी उपस्थित स्थानिक फोटोग्राफर आणि नेटकऱ्यांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे. (Actor Tom Cruise Starrer Mission Impossible 7 BTS Clip Shows Train Crashing Off)

डर्बीशायरच्या स्टोनी मिडलटन येथे मागील अनेक महिन्यांपासून सेट बनवण्याचे काम सुरू होते. स्थानिक फोटोग्राफर जिमने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने लिहिले आहे की, “२० मिनिटांपूर्वी शूट केलेल्या या सीनसाठी ५ महिन्यांपासून वाट पाहत होतो. मिशन: इम्पॉसिबलच्या शूटिंगवेळी टॉम क्रूझही उपस्थित होता. अप्रतिम दिवस!!”

विशेष म्हणजे जेव्हा हा स्टंट शूट केला जात होता, तेव्हा तेथे एक हेलिकॉप्टरही बॅकग्राऊंडमध्ये उडताना दिसले.

खरं तर हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ आपले सर्व स्टंट स्वत:च करण्यासाठी ओळखला जातो. ‘मिशन: इम्पॉसिबल ७’ची शूटिंग कोरोना व्हायरसमुळे थांबवण्यात आली होती. आता हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित करण्याची योजना आहे. यामध्ये टॉम क्रूझव्यतिरिक्त हेन्री, सायमन पेग, रेबेका फर्ग्यूसन, वॅनेसा किर्बी आणि फ्रेडरिकही काम करत आहे.

याव्यतिरिक्त ‘मिशन: इम्पॉसिबल ८’ हा चित्रपट २०२३ प्रदर्शित केला जाईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी

हे देखील वाचा