बहुप्रतिक्षित ‘जुग जुग जिओ’ हा हिंदी सिनेमा शुक्रवारी (दि. २४ जून) सिनेमागृहात प्रदर्शित झाला. राज मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमात वरुण धवन, कियारा आडवाणी, नीतू कपूर, अनिल कपूर आणि मनीष मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. चाहते या सिनेमासाठी खूपच उत्सुक होते. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अशात तब्बल १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ठीक-ठाक कमाई केली आहे.
पहिल्या दिवशी झाली ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई
ट्रेड ऍनालिस्ट रमेश बाला यांनी ‘जुग जुग जिओ’ या सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाईबाबत १० कोटींची भविष्यवाणी केली होती. मात्र, माध्यमांतील वृत्तानुसार, या सिनेमाने शुक्रवारी पहिल्याच दिवशी ९.२८ कोटी रुपयांची कमाई केली. हाती आलेल्या वृत्तानुसार, ‘भूल भूलैय्या २’, ‘सम्राट पृथ्वीराज’, आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमांच्या तुलनेत ‘जुग जुग जिओ’ सिनेमाची कमाई कमी राहिली. ‘भूल भूलैय्या २’ सिनेमाने पहिल्या दिवशी १४.११ कोटी आणि इतर दोन सिनेमांची पहिल्या दिवसाची कमाई जवळपास १०.५० कोटी रुपये होती.
काय म्हणाले होते दिग्दर्शक राज मेहता?
सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता (Raj Mehta) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “हिंदी सिनेमांच्या खराब कामगिरीने सिनेमा प्रदर्शित करण्याबाबती चिंता वाढवली आहे. दर आठवड्याला नवीन थेअरी समोर येत आहे की, कशाप्रकारे सिनेमे चालतील आणि कशाप्रकारे चालणार नाहीत.”
एकूण ४३८९ स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला सिनेमा
येत्या काही दिवसांमध्ये ‘जुग जुग जिओ’ हा सिनेमा कमाईचे नवीन विक्रम बनवू शकतो. दिल्ली-एनसीआर आणि मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्येही या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, निर्मात्यांना या सिनेमाकडून जवळपास १० कोटी रुपयांच्या ओपनिंगची अपेक्षा होती. असे म्हटले जात आहे की, विशेषत: वीकेंड (शनिवार आणि रविवार) या दिवशी सिनेमा चांगली कमाई करू शकतो. हा सिनेमा देशभरातील ३३७५ स्क्रीन्सवर आणि परदेशात १०१४ स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
- चाळीसहून अधिक सिनेमात काम करूनही ‘आश्रम ३’मध्ये इंटीमेट सीन देताना घाबरला होता बॉबी देओल, पण का?
- शाहरुखची बॉलिवूडमधील ३० वर्षे पूर्ण, वाचा कुणालाही मोडता न आलेले ‘किंग खान’चे बॉक्स ऑफिसवरील ‘हे’ ५ विक्रम
- शाहरुख खानच्या बंगल्यातील एक खोली घ्यायचीये? घ्यावी लागेल तब्बल ३० वर्षे मेहनत, खुद्द अभिनेत्याचा खुलासा