Wednesday, June 26, 2024

बॉलिवूड अन् साऊथच्या तुलनेवर हे काय बोलून गेला वरुण धवन, म्हणाला, ‘त्यांचेही ७-८ सिनेमे…’

बॉलिवूडसाठी मागील ५ वर्षे काही खास राहिले नाहीत. अनेक मोठे सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यातील मोजक्याच सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या सिनेमांमध्ये ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘भूल भुलैय्या २’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इतर कोत्याही सिनेमाला फार काही खास कामगिरी करता आली नाही. अशातच चित्रपटगृहात अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. या सिनेमांनी फक्त हिंदीतच नाही, तर जगभरात शानदार कमाई केली आहे. यामुळेच सिनेसृष्टीत दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये आता चर्चेला उधाण आले आहे. यामध्ये अभिनेता वरुण धवन याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमाच्या तुलनेवर आपले मत मांडले आहे.

काय म्हणाला वरुण धवन?
वरुण धवन (Varun Dhawan) म्हणाला की, “सिनेमा आता चांगला चालला आहे. प्रेक्षकांना जो सिनेमा बघायचा आहे, तो सिनेमा पाहण्याचा त्यांना अधिकार आहे. हॉलिवूड सिनेमे इतक्या वर्षांपासून गाजत आहेत. कारण, प्रेक्षकांना ते आवडले आहे. म्हणूनच प्रेक्षकांना ते पाहायचे असतात. मी स्वतः ‘केजीएफ २’ पाहण्याचा आनंद घेतला. हा सध्या सर्वाधिक कमाई करणार्‍या सिनेमांपैकी एक आहे.”

वरुण धवनला मागील काही महिन्यात फ्लॉप झालेल्या बॉलिवूड सिनेमांबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना तो म्हणाला की, काही दाक्षिणात्य सिनेमेही खास करू शकले नाहीत. तो म्हणाला, “त्यांच्या सिनेसृष्टीतीलही सात-आठ मोठे सिनेमे फ्लॉप झाले आहेत. कारण, सध्या प्रदर्शित होणारे सिनेमे गेल्या अडीच वर्षातील आहेत. आता चांगला सिनेमा येईल असे वाटते. हिंदी सिनेसृष्टीत अनेक चांगले सिनेमे आले आहेत. प्रत्येक सिनेमा हिट होऊ शकत नाही. प्रेक्षक वाईट सिनेमे पाहणार नाहीत, मग तो इंग्रजी, हिंदी किंवा साऊथ सिनेमे असो. ते पाहणार नाहीत.”

वरुण धवनचे आगामी सिनेमे
वरुण धवनच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा ‘जुग जुग जिओ’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात वरुण धवनसोबत कियारा आडवाणी, नीतू कपूर, अनिल कपूर आणि मनीष पॉल यांच्या भूमिका असणार आहेत. या सिनेमात रोमान्स असेल. तसेच, हा सिनेमा कुटुंबाचे मनोरंजन करणारा म्हटले जात आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले असून हा सिनेमा येत्या २४ जून, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बॉलिवूडमधील बापमाणसं! ज्यातील काहींनी मुलींना बनवले यशस्वी, तर काहींनी लावली आयुष्याची वाट

हॉटनेसने तरुणांची झोप उडवणाऱ्या अभिनेत्री ईशा गुप्ताने लग्नाबद्दल केला मोठा खुलासा,असा आहे प्लॅन

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या लवस्टोरीचा वरुण धवन झाला लवगुरू, व्हिडिओ होतोय व्हायरल

हे देखील वाचा