बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ वरुण धवनने शनिवारी (२४ एप्रिल) आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याला चाहत्यासोबतच कलाकारांनाही सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशातच ‘फुकरे’ फेम अभिनेता वरुण शर्माने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये वरुण धवन त्याच्यावर उडी मारताना दिसत आहे. चाहत्यांनाही त्याचा हा व्हिडिओ चांगलाच आवडला आहे.
वरुणने शेअर केला मजेशीर व्हिडिओ
वरुण शर्माने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. हा स्लो मोशन व्हिडिओ आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, वरुण शर्मा बेडवर झोपला आहे. त्याच्या पोटावर एक मोठी उशीदेखील आहे. यामध्ये वरुण धवन बेडच्या शेजारील सोफ्यावरून बेडवर उडी घेतो आणि थेट वरुण शर्माच्या अंगावर पडतो. या व्हिडिओमध्ये वरुण शर्माही ओरडताना दिसत आहे.
काय म्हणाला वरुण शर्मा
हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत वरुणने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वरुण धवन मित्रा. खूप प्रेम पाजी. तुझे येणारे वर्ष चांगले राहो.’ यासोबतच त्याने वरुणने दिल आणि किसचा इमोजीचाही समावेश केला आहे. चाहते या व्हिडिओवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत प्रेम व्यक्त करत आहेत.
ऑनस्क्रीनही आहेत चांगले मित्र
खरं तर वरुण धवन आणि वरुण शर्मा यांनी ‘दिलवाले’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ऑनस्क्रीनसोबतच ऑफस्क्रीनही ते दोघे चांगले मित्र आहेत. रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. शाहरुख खान, काजोल आणि क्रिती सेननही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
आगामी प्रोजेक्ट्स
वरुण शर्माच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच ‘फुकरे ३’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या रीडिंग सेशनचाही एक मजेशीर व्हिडिओ वरुणने शेअर केला होता.
दुसरीकडे वरुण धवनबद्दल बोलायचं झालं, तर ‘मिस्टर लेले’, ‘भेडिया’ आणि ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचाही समावेश आहे. ‘भेडिया’ चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेननही मुख्य भूमिकेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-वाथी कमिंग! भन्नाट डान्स करत अभिनेता संदिप पाठकने समाजाला दिला मोलाचा सल्ला