Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल लग्नाआधीच सापडले संकटात, दोघांच्या नावाने तक्रार दाखल

कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल लग्नाआधीच सापडले संकटात, दोघांच्या नावाने तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची तयारी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स बरवारा फोर्ट हॉटेलमध्ये जोरात सुरू आहे. यादरम्यान सवाई माधोपूरच्या वकिलाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सवाई माधोपूरमध्ये कॅटरिना आणि विक्की यांच्यासह हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत नेत्रबिंद सिंग जदौन यांनी सांगितले की, चौथ माता मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. ज्यामध्ये दररोज अनेक भाविक दर्शन आणि आरती करण्यासाठी येतात. हॉटेल सिक्स सेन्स व्यवस्थापनाने ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत चौथ माता मुख्य रस्ता बंद ठेवल्याने येथे येणाऱ्या भाविकांना त्रास होत आहे. भाविकांच्या भावना आणि समस्या लक्षात घेऊन वकिलांच्या वतीने जिल्हा सेवा प्राधिकरण सवाई माधोपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. जनभावना लक्षात घेऊन हा मार्ग सुरळीत सुरू करण्याची मागणी वकिलांनी अर्ज सादर करून केली आहे. (actor vicky katrina wedding complaint filed against katrina kaif vicky kaushal and hotel management)

कॅटरिना आणि विक्कीचे कुटुंब फोर्टवर पोहोचले असून, त्यापूर्वी ६ डिसेंबर रोजी मुंबईच्या कलीना विमानतळावर या दोघांच्या कुटुंबातील प्रत्येक जण स्पॉट झाला होता. विक्की जिथे ट्राऊझर आणि प्रिंटेड शर्टमध्ये दिसला. त्याचवेळी कॅटरिना पिवळ्या रंगाच्या शराऱ्यात दिसली. दोघेही ९ डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या फोटोंबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत

याशिवाय कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या डाएटबद्दल बोलायचे झाले, तर दोघेही नो कार्ब डाएटवर आहेत. दोघांचे जवळचे मित्र आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी लग्नासाठी राजस्थानमध्ये पोहोचले आहेत. विमानतळावर कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांचे जोरदार स्वागत देखील करण्यात आले. ज्याचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत.

vicky and katrina
Photo Courtesy Instagramvickykaushal09 katrinakaif

ज्या हॉटेलमध्ये कॅटरिना आणि विक्की लग्न करणार आहे, त्या हॉटेल सिक्स सेन्समधील सामान्य खोलीत राहण्यासाठी एका रात्रीचे ७७,००० रुपये आणि करासह सुमारे ९०,००० रुपये भाडे आहे. विशेष सुटसाठी तर तब्बल ४ लाख ९४ हजार रुपये भाडे आकारले जाते.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा