Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

असं काय झालं की, लग्नानंतर विकी अन् कॅटरिना जाणार नाहीत हनीमूनवर? घ्या जाणून

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार जोड्या लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये आघाडीवर असलेली जोडी म्हणजे, विकी कौशल आणि कॅटरिना कैफ होय. त्यांचे लग्न पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये होणार असल्याच्या चर्चा आहेत. असे असले, तरीही विकी आणि कॅटरिनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. लग्नाची तारिख, ड्रेस, ठिकाण, आणि मुंबईतील भाड्याने घेतलेल्या आलिशान फ्लॅटनंतर आता चाहत्यांना जी गोष्ट जाणून घ्यायची आहे, म्हणजे, हे जोडपे हनीमूनसाठी कुठे जाणार आहेत.

विकी आणि कॅटरिना कैफच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. दोघांच्याही जवळचे नातेवाईक या लग्नात सामील होणार आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, कॅटरिनाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, कॅट गुप्तपणे काम करणारी व्यक्ती नाही, त्यामुळे लवकरच ही चांगली बातमी येऊ शकते. (Actor Vicky Kaushal Katrina Kaif Will Not Enjoy HoneyMoon After Marriage Know The Reason Here)

लग्नानंतर विकी आणि कॅटरिना हनीमूनवर जाणार नसल्याचे माध्यमांमध्ये वृत्त आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, विकी आणि कॅटरिनाने आपले चित्रपट वेळेवर पूर्ण करणार असल्याचे वचन दिले आहे. त्यामुळे ते आपले काम पूर्ण झाल्यानंतरच हनीमूनवर जातील.

आता लग्नानंतर किती वेळानंतर हे जोडपं हनीमूनवर जाणार आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र, चाहते हे जाणून घेण्यासाठी आतुर आहेत की, दोघेही हनीमूनवर कुठे जातील.

कॅटरिनाला ‘टायगर ३’ ची शूटिंग पूर्ण करायची आहे. यानंतर ती श्रीराम राघवन यांच्या अद्याप शीर्षक न ठरवलेल्या चित्रपटात काम करणार आहे. कॅटरिना लग्नानंतर डिसेंबरमध्ये दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगवर परतणार आहे. दुसरीकडे, विकी कौशलला ‘सॅम बहादूर’च्या शूटिंगवर परतायचे आहे.

विकी शेवटचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सरदार उधम’ या चित्रपटात झळकला होता. त्याच्याकडे ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’, ‘तख्त’ आणि ‘मिस्टर लेले’ या चित्रपटातही दिसणार आहे. दुसरीकडे कॅटरिना कैफ शेवटची नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती आता ‘फोन भूत’, ‘मेरी क्रिसमस’ यांसारख्या चित्रपटात दिसणार आहे.

हे देखील वाचा