Saturday, June 29, 2024

वाढदिवशी विकी कौशलचा जुना व्हिडिओ व्हायरल; साऊथ इंडियन लूकमध्ये अभिनेत्याने केली मजेशीर ऍक्टिंग

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल रविवारी (१६ मे) आपला ३३ वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. विकीला त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. त्याने कमी वेळातच आपला एक चाहता वर्ग तयार केला आहे. कित्येक मुली त्याच्यावर घायाळ होतात. चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतात. विकी प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारे अभिनय करताना दिसतो, ‘मसान’, ‘रमण राघव’, ‘राजी’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ अशा बर्‍याच प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पडली आहे. तो नेहमीच आपल्या भूमिकेत स्वतःला पूर्णतः झोकून देत असतो. याच कारणास्तव विकी आज बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे.

त्याच्या वाढदिवशी त्याचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो दक्षिण भारतीय लूकमध्ये दिसला आहे. विकी कौशलचा व्हायरल व्हिडिओ त्याच्या अभिनय शिकत असलेल्या दिवसातील आहे. या गोंडस व्हिडिओमध्ये विकी दक्षिण भारतीय लूकमध्ये दिसत आहे. त्याने लुंगी आणि चेक शर्ट घातला आहे.

या व्हिडिओमध्ये तो विनोदी अभिनय करतोय. त्याच्यासोबत एक अभिनेत्रीही दिसली आहे. विकी कौशल ‘किशोर नमित अभिनय’ शाळेचा माजी विद्यार्थी आहे.

विकीचा हा व्हिडिओ सन २०१९ मध्ये इंस्टाग्रामवर ‘रेयर फोटो क्लबने’ शेअर केला आहे. विकीने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात २०१२ साली ‘गँग्स ऑफ वासेपुर’मधून केली होती. या चित्रपटात तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.

विकीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘सॅम बहादूर’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारताचे महान सैनिक ‘फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ’ यांच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय तो ‘सरदार उधम सिंग’वर आधारित चित्रपटातही काम करत आहेत. वृत्तानुसार या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मागितली आईची माफी; फोटो शेअर करत म्हणाला…

-काय सांगता! हॉलिवूडमध्ये जाण्यास राखी सावंत सज्ज, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

हे देखील वाचा