बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल त्याच्या ‘सरदार उधम’ चित्रपटासाठी चर्चेत आला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील विक्कीच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. तो या चित्रपटात सरदार उधम सिंगच्या भूमिकेत दिसला आहे. विक्की कौशल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, विक्की आणि कॅटरिना एकमेकांना डेट करत आहेत. आता चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तो याबद्दल बोलला आहे.
विक्की आणि कॅटरिना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या खूप दिवसांपासून येत आहेत. अलीकडेच, विक्की आणि कॅटरिनाचा रोका झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र कॅटरिनाच्या टीमने ही बातमी अफवा म्हणून फेटाळून लावली होती. आता विक्की त्याच्या आणि कॅटरिनाच्या रोका संबंधित बोलला आहे.
रोकाच्या बातमीवर विक्कीने तोडले मौन
रोका झाल्याच्या अफवा पसरवण्यासाठी विक्कीने पॅपराजीला दोष दिला आहे. त्याने माध्यमांना सांगितले की, “मित्रांनी ही बातमी पसरवली आहे. योग्य वेळ आल्यावर मी लवकरच लग्न करेन. त्याचीही वेळ लवकरच येईल.”
कॅटरिनाही आली होती स्पेशल स्क्रीनिंगसाठी
विक्की आणि कॅटरिना अनेकदा एकत्र दिसतात. विक्कीला अनेकवेळा कॅटरिनाच्या घरी जाताना पाहिले गेले आहे. एवढेच नाही, तर शुक्रवारी कॅटरिना ‘सरदार उधम’च्या स्पेशल स्क्रीनिंगलाही हजर होती.
कॅटरिनाने केले चित्रपटाचे कौतुक
‘सरदार उधम’ पाहिल्यानंतर कॅटरिनाने सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक केले आहे. ‘सरदार उधम’चे पोस्टर शेअर करत तिने शूजित सरकारसह विक्कीचे कौतुक केले आहे. तिने लिहिले की, “शूजित सरकार, काय व्हिजन आहे तुमचा, काय सुंदर चित्रपट होता. कथा अतिशय सुंदरपणे मांडली आहे, बांधून ठेवणारा, शानदार चित्रपट. प्युअर स्टोरी टेलिंग. विक्की कौशल एकदम प्युअर टॅलेंट, प्रामाणिक आणि हृदयद्रावक आहे.” यासह तिने तुटलेले हृदय, हात जोडून आणि स्टार इमोजी पोस्ट केले आहेत.
‘सरदार उधम’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर हा जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक ‘उधम सिंग’ यांच्या जीवनावर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले आहे. १९१९ च्या जालियनवाला हत्याकांडासाठी पंजाबचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर मायकल डायर जबाबदार आहेत. चित्रपटाची कथा उधम सिंगच्या भोवती बनवली गेली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कथित बॉयफ्रेंड विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटावर कॅटरिना कैफने उधळली स्तुतीसुमने, म्हणाली…’
-कॅटरिना कैफ अन् विक्की कौशल लवकरच लग्न करणार?? सलमान खानचा स्टायलिस्ट एशले रेबेलोकडून मिळाले संकेत
-मोठ्या संकटातून कटरीना आली बाहेर, मानले मदत करणाऱ्या ‘या’ लोकांचे आभार