Tuesday, July 9, 2024

कॅटरिना कैफसोबत लग्नाच्या अफवांदरम्यान, विकी कौशलने केला त्याच्या आवडत्या मुलीबद्दल खुलासा

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या कॅटरिना कैफ सोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. मात्र, अद्याप दोघांकडून अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, विकीने सांगितले आहे की, त्याला कोणत्या मुलीला त्याची आयुष्याची साथीदार बनवायचे आहे. विकी ‘वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या साहसी शोमध्ये दिसणार आहे. बेअर ग्रिल्सने विकीला बॉलिवूड अभिनेत्याचा अविश्वसनीय पाहुणा म्हणून वर्णन केले आहे. या शोमध्ये विकी त्याचे वैयक्तिक आयुष्य तसेच त्याची सर्वात मोठी भीती उघड करताना दिसणार आहे, पण त्याने सर्वात मोठी गोष्ट म्हणजेच, त्याच्या जोडीदाराबद्दल सांगितली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, विकीने बेअर ग्रिल्सच्या शोमध्ये सांगितले होते की, त्याचा जन्म एका छोट्या घरात झाला आहे. अभिनयामुळे त्याने इंजिनीअरिंगचं शिक्षण मधेच सोडले. त्याला समुद्राच्या खोल पाण्याची भीती वाटते. सध्या विकीने त्याची कथित गर्लफ्रेंड कॅटरिनासोबत लग्न केल्याची जोरदार चर्चा आहे. बेअर ग्रिल्सने त्याला विचारले की, त्याला कोणत्या प्रकारची मुलगी आपली पत्नी बनवायची आहे. या प्रश्नाच्या उत्तरात विकीने सांगितले की, “जो तुम्हाला नेहमी घरात असल्याचे फिल करून देतो, तुम्ही कोणाशी कनेक्ट होऊ शकता. जो एकमेकांच्या उणीवा, चांगले गुण माहिती असूनही तुमच्यावर प्रेम करतो आणि समजून घेतो.”

माध्यमांतील वृत्तांनुसार, विकी आणि कॅटरिनाने दिग्दर्शक कबीर खानच्या घरी साखरपुडा केला आहे. मात्र, विकी आणि कॅटरिना या दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या वृत्तावर मौन बाळगले आहे. शोच्या मध्यभागी, विकीला त्याच्या वडिलांकडून एक संदेश मिळतो, ज्यामुळे तो भावुक होतो. शाम कौशल म्हणतात की, “हॅलो पुत्तर, तुझ्यावर प्रेम आहे, मी थोडा तणावात आहे. जगाच्या काही ठिकाणी जिथे आपले कोणीच नसते, तिथे टिकणे थोडे अवघड असते, पण मला माहित आहे की, तुझ्यासोबत बेअर ग्रिल्स आहे. जो जगातील सर्वात मोठा सर्व्हाइव्हर आहे. त्यामुळे कृपया हार मानू नको, इतर विजेत्यासारखे बाहेर पड, आम्ही सर्व तुझी वाट पाहत आहोत.”

यावर विकी सांगतो की, त्याचे वडील त्याचे सर्वात मजबूत आधारस्तंभ आहेत. तसेच, तो बेअर ग्रिल्सला त्याच्या आयुष्याबद्दल सांगतो. “मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी होतो. माझ्या वडिलांना आपला मुलगा इंजिनीअर होणार असल्याचा आनंद होता. कारण, माझ्या कुटुंबातील कोणीही ९-५ नोकरी केली नाही. दर महिन्याला चेक मिळेल, वीकेंडला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. म्हणूनच ते खुश होते की, कुटुंबातील कोणीतरी आयुष्य जगणार आहे. मात्र, मला अभिनेता व्हायचं होतं, म्हणून मी इंजिनीअरिंग सोडली.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर विकी कौशल आणि सारा अली खान त्यांच्या आगामी ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. या चित्रपटात सारा आणि विकी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

-‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

हे देखील वाचा