मनोरंजन विश्वामध्ये चाहत्यांना अभिनयाबरोबरच कलाकारांच्या अफेअरबद्दल माहिती ठेवायला जास्त आवडते. अशात सध्या अभिनेता विद्युत जामवाल आणि फॅशन डिझायनर नंदिता मेहतानी यांच्या नात्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या दोघांनी साखरपुडा केला आहे की काय? असा प्रश्न पडला आहे.
काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आपलं एकमेकांवर प्रेम असल्याचं जाहीर केलं होत. सध्या ते आग्रा येथे फिरायला गेले आहेत. शनिवारी हे दोघे ताजमहाल पोहचले, तिथे त्यांनी भरपूर फोटोशूट केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये नंदिताच्या हातामध्ये अंगठी पाहून चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता खूप वाढली आहे. त्यांनी ताजमहालला भेट देताना पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. विद्युतने संपूर्ण पांढऱ्या रंगाची कपडे घातले आहेत, तर नंदिताने पांढरा टॉप आणि एक फुलांचा भरलेला स्कर्ट घातला आहे. दोघेही या फोटोंमध्ये खूप छान दिसत आहेत. (Actor Vidyut and fashion designer Nandita got engaged fans got suspicious after seeing the diamond ring)
यातील व्हायरल झालेल्या फोटोमध्ये या दोघांनी एकमेकांचे हात हातामध्ये धरले आहेत आणि नंदिताच्या बोटामध्ये एक हिऱ्याची अंगठी दिसत आहे. अभिनेत्री नेहा धूपियाने या दोघांचा हा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, या दोघांनी ३ सप्टेंबर रोजी साखपुडा केला आहे. आता नेहाने देखील त्यांना शुभेच्छा दिल्यामुळे खरोखjच त्यांचा साखरपुडा झालेला आहे, असे म्हणायला हरकत नाही. या दोघांच्या लग्नाच्या बातमीची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
यांच्या आधीच्या लग्नाविषयी बोलाचे झाले, तर नंदिता मेहतानीचे लग्न करिश्मा कपूरचा पहिला पती संजय कपूरसोबत झाले होते. त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोट झाला. मग संजयने करिश्मासोबत लग्न केले होते. त्यानंतर नंदिताचे अफेअर अभिनेता आणि मॉडेल डीनो मोरियासोबत सुरू होते. परंतु तिचे त्याच्या बरोबर देखील फारसे पटत नसल्याने ते दोघे वेगळे झाले. तसेच विद्युत जामवालबद्दल बोलायचे झाले, तर त्याचे २ वर्षे मोना सिंग बरोबर अफेअर सुरु होते. नंतर या दोघांनी देखील ब्रेकअप केले. आता विद्युत आणि नंदिताचे अफेअर सुरु आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ
-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…