Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा

विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा

 

‘कमांडो’ फेम अभिनेता विद्युत जामवालने आपली मैत्रिण फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी एका खासगी समारंभात साखरपुडा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विद्युत कायमच त्याच्या जबरदस्त फिटनेससाठी आणि त्याच्या मार्शल आर्टच्या कलेसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण देखील याच कलेचा वापर करून जरा हटके पद्धतीने अविस्मरणीय करण्याचे ठरवले.

विद्युत जामवालने त्याचा साखरपुडा संस्मरणीय करण्याची कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्या स्टाईलला सोशल मीडियावर भरभरून प्रेम मिळत आहे. आर्मी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या विद्युतने त्याच्या गर्लफ्रेंडला नंदिताला प्रपोज करण्यासाठी अतिशय वेगळी मात्र लक्षवेधी स्टाईल वापरून त्यांचा हा खास क्षण अधिकाधिक खास केला. विद्युत त्याच्या मैत्रिणीला घेऊन आग्र्याजवळील मिलिटरी कॅम्पमध्ये पोहोचला. तिथे या दोघांनी रॅपलिंग करत १५० मीटर लांब भिंतीवर चढले. भिंतीवर चढत असतानाच विद्युतने नंदिताला प्रपोज केले. तिने हो म्हणताच विद्युतने तिला अंगठी घातली. अतिशय युनिक पद्धतीने रॅपलिंग करत या दोघांनी साखरपुडा केला.

साखरपुडा संपन्न झाल्यानंतर दोघेही ताजमहाल पाहायला देखील गेले होते. इंस्टाग्राम अकाऊंटवर विद्युतने दोन फोटो शेअर केले आहे. १ सप्टेंबरला त्यांनी साखरपुडा केला. त्याने पोस्ट केलेल्या फोटोंपैकी एका फोटोत ते दोघे रॅपेलिंग करताना कॅमेऱ्याकडे पाहत आहेत. तर दुसऱ्या फोटोत दोघेही ताजमहालासमोर उभे आहेत. विद्युतने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “कमांडो स्टाईलमध्ये केले.” कॅप्शनसोबत त्याने अंगठीचे इमोजी आणि साखरपुड्याची तारीख देखील लिहिली आहेत.

हा फोटो शेअर करताना नंदिताने असेही लिहिले आहे की, “जास्त काळ याप्रमाणे लटकू शकत नव्हते, म्हणून हो म्हणले.” डब्बू रतनानी, दिया मिर्झा, तुषार कपूर, अनन्या पांडे, रिद्धिमा कपूर, तनिषा मुखर्जी यांसारख्या कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नंदिता महतानी एक कलाकार फॅशन डिझायनर आहे. ती विराट कोहलीची स्टायलिस्टही राहिली आहे. करिश्मा कपूरचा पहिला पती असणाऱ्या संजय कपूरसोबत नंदिताचे पहिले लग्न झाले होते. पण दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा

 

हे देखील वाचा