दाक्षिणात्य चित्रपटांमधील अभिनेता विजय देवरकोंडाने साऊथ चित्रपटांमध्ये चांगलीच पसंती मिळवली आहे. अशात आता बॉलिवूड गाजवण्यासाठी देखील तो मैदानात उतरला आहे. लवकरच त्याचा ‘लायगर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्याच्या दमदार अभिनयाने एका अभिनेत्यासह तो आता एका मल्टीप्लेक्सचा मालक देखील बनला आहे.
विजयने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना आणखी एक गोड बातमी दिली. तो ‘एशियन विजय देवरकोंडा सिनेमाज’ या मल्टीप्लेक्सचा मालक बनला असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच या विषयी अभिनेता अर्जुन रेड्डीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “एका अभिनेत्यापासून ते आता स्वतःच्या मालकीचे मल्टीप्लेक्स असेपर्यंत मी आपल्या सगळ्यांबरोबर ‘एशियाई विजय देवरकोंडा’ शेअर करतो. हा मल्टीप्लेक्स २४ सप्टेंबर २०२१ मध्ये सुरु होणार आहे.” अनेकांचं असं म्हणणं आहे की या मल्टीप्लेक्समध्ये अक्किनेनी नागा चैतन्य आणि साई पल्लवी या कलाकारांचा पहिला चित्रपट दाखवण्यात येईल. (Actor Vijay devarakonda from an actor now owner of multiplex cinema)
आधी बॉलिवूडमध्ये पदार्पण आणि आता मल्टीप्लेक्समुळे त्याचे चाहते खूप खुश आहेत. ‘लायगर’ या चित्रपटामध्ये विजय बरोबर अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करत असून करण जोहर याची निर्मिती करत आहे. या चित्रपटाची शूटिंग बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. तसेच सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहे. करणसह चार्मी कौर, पुरी जगन्नाथ आणि अपूर्व मेहता या चित्रपटाच्या निर्मितीचे काम पाहत आहेत.
काय आहे ‘लायगर’ प्रॉमिस
नुकताच अभिनेता ‘इंडियन आइडल’ १२ मध्ये पोहचला होता. तिथे त्याला शन्मुखप्रियाचे गाणे खूप आवडले. तिच्या आवाजाला दाद देत त्याने तिचे खूप कौतुक केले. तसेच ती या शोमध्ये जिंको किंवा न जिंको, तरी देखील तो तिला हैदराबादमध्ये भेटणार असे त्याने सांगितले होते. तसेच तिच्या आवाजामुळे त्याने तिला ‘लायगर’ चित्रपटामध्ये गाण्याची संधी देण्याचे वचन दिले होते. त्याने हे वचन पूर्ण देखील केले आणि शन्मुखप्रियाला ‘लायगर’ चित्रपटामध्ये गाण्याची संधी मिळाली. त्यावेळी लाइगर प्रॉमिस हा हॅशटॅग सोशल मीडियावर खूप चर्चेत होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप